Dhule

वकवाड ता.शिरपूर येथे ०९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी भव्य रक्तदान शिबीर व १०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित.

वकवाड ता.शिरपूर येथे ०९ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी भव्य रक्तदान शिबीर व १०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित.

प्रतिनिधीधुळे राहुल साळुंके

शिरपूर तालुक्यातील समस्त समाजजनांना कळविण्यात येते की, जागतिक आदिवासी दिवस लॉकडाऊन मुळे काही नियम व मर्यादा पाडून साजरा करावयाचा असल्यामुळे त्याचे औचित्य साधून Social Distancing च पालन करून
MADA(महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन), जय आदिवासी युवा शक्ती महाराष्ट्र(JAYS, Maharashtra), मुकेशभाई पटेल ब्लड बँक, शिरपूर तसेच ग्रामपंचायत,वकवाड व जागतिक आदिवासी दिवस उत्सव समिती, जयस वकवाड ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी रक्तदान शिबिर वकवाड ता.शिरपुर येथे आयोजित करावयाचे योजिले आहे त्याकरीता सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे
मागील वर्षी ह्या दिवशी आपण कोडीद येथे केलेलं रक्तदान आपल्या समाजासाठी वरदान ठरले होते कारण मागील वर्षी वाघाडी तालुका शिरपूर येथील कंपनी जळीत कांडात आपले आदिवासी समाजाचे मोठे नुकसान झाले होते मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त होती तसेच जखमींचा आकडा पण नगण्य होता त्यासाठी भरपूर रक्तसाठा लागत होता त्यावेळी आपण मागील वर्षी ह्या दिवशी केलेल्या रक्तदान करून साठवलेल रक्त त्या जखमी गरजू लोकांच्या कामी आल होत.
ह्यावेळी सुद्धा आपण संकल्प करून रक्तदान केले तर समाजासाठी अथवा आपल्या समाजातील एखाद्या कोरोना पिडीत अथवा एखाद्या गरीब गरजू लोकांसाठी उपयोगी आणू शकतो तशी ग्वाही शास्वती ब्लड बँक कडून घेऊच.
दान केलेले रक्त आपल्या गरजु आदिवासी बांधवांना तात्काळ उपलब्ध होण्यासाठी सदर ब्लड बँक तयार आहेत ह्या नेककामी सर्वांनी रक्तदान करावे
रक्तदात्यास प्रमाणपत्र, जयस मास्क व आदिवासी दिनाचे टीशर्ट वाटप चा कार्यक्रम करण्यात येणार आहे
वेळ: सकाळी 10 वाजेपासुन
स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय, वकवाड ता.शिरपूर जि.धुळे
विनीत :युवा शक्ती वकवाड, जय आदिवासी युवा शक्ती(JAYS), महाराष्ट्र
आपला समाजबांधव
जय आदिवासी युवा शक्ती,महाराष्ट्र

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button