Maharashtra

पत्रकाराच्या वतीने रक्तदान करून माणूसकी चे दर्शन घडवले

पत्रकाराच्या वतीने रक्तदान
करून माणूसकी चे दर्शन घडवले

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

औसा

कोरोना व्हायरस मुळे दवाखान्यात रुग्णांना रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते,याच्याऔसा येथील पत्रकार,सामाजिक संघटना व पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने सोमवार दिनांक 30 मार्च 2020 रोजी येथील पंचायत समिती बचत भवन येथे अर्पण रक्तदान पेढी लातूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून औसा तालुक्यातील पत्रकारांनी इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले, या आवाहनास प्रतिसाद देऊन 47 युवकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करून कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी हातभार लावला,सकाळी 10 ते 2 या वेळेत 47 युवकांनी अत्यंत शिस्तीत रक्तदान केले, या रक्तदान शिबिरास गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख यांनी भेट देऊन उपक्रमा बद्धल पत्रकारांचे अभिनंदन केले,यावेळी अर्पण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी बालाजी जाधव ,डॉ शीला पवार, वनश्री शिरसाठे ,मंदाकिनी महापुरे,निर्मला हजारे ,अरमान सय्यद यांनी शिबिरास मार्गदर्शन केले ,औसा तालुक्यातील पत्रकारांनी रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर संचारबंदी व लॉकडाऊन असतानाही कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी रक्तदात्यांनी रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडविले ,लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सचिन मिटकरी ,शिवशक्ती संघटनेचे दादा कोपरे ,पत्रकार संजय सगरे, राम कांबळे ,विनायक मोरे,शमशुल काझी,बालाजी उबाळे,श्रीधर माने,रामकृष्ण जाधव,विलास तपासे,नदीम सय्यद,मुक्तार मणियार,असिफ पटेल,जलील पठाण,रोहित हंचाटे ,प्रकाश कुसुमकर ,सुरेश हंचाटे ,विनोद जाधव,खुंदमीर मुल्ला,रोहित सगरे,किरण दुरुगकर,यांच्यासह इतर मान्यवर शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते, रक्तदात्यांना अर्पण रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले, शिवशक्ति संघटनेच्यावतीने उपस्थितांना मास्क वाटत करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button