Bollywood

?️बॉलिवूड Breaking… बाहुबलीचे 6 वर्ष..! पहा प्रभास ने काय शेअर केला इंस्टावर ट्रेंड..!

?️बॉलिवूड Breaking… बाहुबलीचे 6 वर्ष..! पहा प्रभास ने काय शेअर केला इंस्टावर ट्रेंड..!

बॉलिवूड बाहुबली: बिफोर द बिगीनिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत.परंतु आजही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही प्रत्येक प्रेक्षक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतो.या चित्रपटाने केवळ देशातच नव्हे तर संपुर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. प्रचंड लोकप्रियता मिळवत ह्या चित्रपटाने अब्जावधी रु ची कमाई केली. ह्या चित्रपटाची कथा,संगीत,एनिमेशन इ मुळे तर चित्रपट गाजलाच पण ह्यातील कलाकारांनी केलेल्या अभिनयाने देखील तितकाच चर्चिला गेला.दक्षिणेचा सुपरस्टार प्रभास हा ह्या चित्रपटामुळे जगविख्यात झाला. ‘बाहुबली’ चित्रपटाला आज ६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साउथ सुपरस्टार प्रभासने चाहत्यांचे आभार मानले आहेत. आणि सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करत ‘बाहुबली’च्या टीमसाठी एक स्पेशल पोस्ट देखील लिहिलीय.

सुपरस्टार प्रभास याचा ‘बाहुबली’ हा जगभरात ६५० कोटी रूपयांची कमाई केलेला पहिला दक्षिणात्य चित्रपट ठरला. प्रभासच्या ‘बाहुबली’ने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. प्रभास हा पहिला अभिनेता आहे ज्याला रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये ह्या चित्रपटाचा प्रिमियर साजरा करण्याचा बहुमान मिळाला. या ठिकाणी प्रिमियर होणारा हा सर्वात पहिला नॉन इंग्लिश सिनेमा ठरला. भारतात सर्वात जास्त कमाई करणारा ‘बाहुबली’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज ६ वर्ष झाली तरी या चित्रपटासाठीची क्रेझ मात्र अजुनही प्रेक्षकांमध्ये आहे.

यानिमित्ताने सुपरस्टार प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बाहुबली’च्या सेटवरचा एक जुना फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘बाहुबली’च्या सीनमधला हा फोटो असून यात त्याने स्वतःच्या हाताने विशालकाय शिवलिंग उचलून ठेवताना दिसून येत आहे. ‘बाहुबली’ मधला हा सीन प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणार ठरला. हा फोटो शेअर करत त्याने एक पोस्ट देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलं, “#6YearsOfBaahubali: ही ती टीम आहे ज्यांनी संपुर्ण देशात आणि जगभरात सिनेमाचा जादू पसरवला होता…”

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्व प्रेक्षकांना एकच प्रश्न पडला होता. ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’. या प्रश्नाने जगभरात खळबळ माजली होती. प्रेक्षकांच्या या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी चित्रपट बनविणार्यांनी ‘बाहुबली २’ भेटीला आणला. हा चित्रपट सुद्धा बॉक्स ऑफिसवर खूपच हिट ठरला.?️बॉलिवूड Breaking... बाहुबलीचे 6 वर्ष..! पहा प्रभास ने काय शेअर केला इंस्टावर ट्रेंड..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button