? सुभाष चौक ते तांबेपुरा रस्ता संध्याकाळी ७ वाजेनंतर अंधारमय…..
कामगार महिला भगिनींची शहरातुन घरी येतांना होते जीवघेणी धावपळ…
अमळनेर नगर परिषद त्या रस्त्यावर हायमास्ट पथदिवे बसऊन रस्ता प्रकाशमय करेल का ??
संदीप सैंदाणे
अमळनेर..विकास कामांच्या दृष्टीने तांबेपुरा परीसर तसा अडगळीत पडलेल्या फाईल सारखा गेल्या अनेक दशकांपासून धुळखात पडलेला असून लोकप्रतिनिधिंच्या उदासिनतेमुळे परिसरातिल नागरिकांना अनेक गैरसोईंना वर्षानुवर्षे तोंड द्यावे लागत आहे.
कृषीभुषण दादा त्यांच्या कल्पकतेला वाव देऊन आमचा तांबेपुरा परीसराचा विकासाभिमूख नावलौकि़क माननिय नगराध्यक्षा ताईसाहेब यांच्या माध्यमातून करतिल या भाबडया अपेक्षेने परिसरातील मतदारांनी भरभरून मतदान दिले .अजूनसुद्धा ताईसाहेब नगराध्यक्षा पुष्पलता पाटील ह्या कृषीभुषण दादांसोबत तांबेपुरा परिसरात येऊन आम्हाला विकासात्मक न्याय देतिल असे नागरिकांना वाटते.
” प्रशासनाचे लक्ष जेंव्हा पडेल तेंव्हा..
तुर्तास ..तांबेपुरा परिसराकडे येणाऱ्या रस्यावरील पथदिवे त्वरीत,जलदगतिने तथा तातडीने बसवावेत ही नागरीकांची प्रमुख ,प्राधान्यक्रमांकाची मागणी आहे .
तांबेपुराकडे येणाऱ्या महीला भगिनींना तसेच प्रवाशांना राञी अंधाराचा व एकांताचा गैरफायदा घेऊन चोर,माथेफिरू,रेल्वेतुन ऊतरलेले वेडसर तसेच रोडरोमियोंकडून ञास होण्याची शक्यता असते .तश्या घटनाही ह्या परिसरात होत असतात.त्याअनुषंगाने पथदिवे बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे…






