Chimur

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शहिंदाना केले अभिवादन

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शहिंदाना केले अभिवादन

चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके

पुर्ण भारत देश इंग्रजांच्या गुलामीत असताना चिमूर शहर मात्र १६ आगष्ट १९४२ ला तिन दिवस स्वांतत्र होता .या स्वांतत्र्या करीता चिमूर परीसरातील अनेक क्रांतीकारकांना हौतात्म पत्करावे लागले. तर अनेकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली .या इतिहासाची महती येणाऱ्या पिढीला व्हावी व क्रांतीविरांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने १६ आगष्ट निमीत्त चिमूर शहरात क्रांती दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत होता.मात्र शहीद स्मृती दिन सोहळ्यावर कोरोणाचा प्रादुर्भावाने छोटे खाणी कार्यक्रम घेण्यात आला .

चिमूर शहिद स्मृती दिन सोहळ्याचे औचित्य साधुन पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूर क्रांती शहिद विरांना अभिवादन करण्या करीता अंभ्यंकर मैदानावरील हुतात्मा स्मारक व शासकिय हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पन केले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवाणी वडेट्टिवार ,महिला कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष चित्रा डांगे, नगराध्यक्ष जीप सदस्य गजानन बुटके गोपाल झाडे,तालुका अध्यक्ष माधव बिरजे, जीप सदस्य ममता डुकरे , घनश्याम डुकरे पंचायत समीती सभापती लता पिसे,सदस्य भावना बावनकर,नर्मदा रामटेके, शांताराम सेलवटकर,गिता कारेमंगे,उपाध्यक्ष तुषार शिंदे,नगरसेवक तुषार काळे, उमेश हिंगे ,नितीन कटारे ,सिमा बुटके , भिमराव ठावरी , संजय डोंगरे राजु लोणारे ,सुधीर पंदीलवार सुनील दाभेकर प्रमोद दांडेकर राका तालुका अध्यक्ष योगेश ठुने इत्यादी हजर होते .

पालकमंत्र्यांनी घेतला कोरोणाचा आढावा-

उप विभागीय अधिकारी कार्यालयात नामदार विजय वडेट्टीवार यांनी कोरोणा प्रतिबंध उपाययोजना विषयी आढावा घेतला.कोरोणा विषयी आरोग्य यंत्रणेने चिमूर तालुक्यात केलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले .या बैठकिदरम्यान चिमूर येथील आरोग्य विभागातील रिक्त पदे ,उपजिल्हा रुग्णालयातिल सोनोग्रॉफी संयत्र तसेच डायलसिस कक्ष ,ऑक्सीजन पुरवठा येत्या काही दिवसात करण्यात येणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्र्यांनी केले .या बैठकीला उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ,तहसीलदार संजय नागटिळक,मुख्याधिकारी मंगेश खवले, वैद्यकिय अधिक्षक डॉ .गो.वा .भगत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगांबर मेश्राम, संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी ,ठानेदार स्वप्नील धुळे. इत्यादी अधिकारी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button