विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने पाडळीकर मंत्रमुग्ध.
उत्कृष्ट वेशभूषा केलेल्या पाडळी प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अफलातून नृत्यांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
दिलीप वाघमारे
पाडळी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन(कलाविष्कार 2020) मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले. विद्यार्थ्यांनी अतिशय बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचा मुकुटमणी ठरला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोणंद पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष चौधरी यांनी बोलताना शाळेचे कामकाज, क्रीडास्पर्धा व इतर स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे कौतुक करत मराठी शाळा गुणवत्तेत अग्रेसर असल्याचे विषद केले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेन झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी गोंधळगीत, शिवराज्याभिषेक, सैनिकांची जीवनकथा, ट्रम्प तात्या नाटक, टिपरी नृत्य, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, कोळी नृत्य, लावणी नृत्य सादर करत उपस्थितांना भारावून सोडले. शंकरा रे शंकरा, बालगीते, कुण्या गावचं पाखरू, छोटा बच्चा, वाघ्या मुरळी, एकच राजा, फिरवीन माझ्या गाडीवर यांसारख्या मराठी व हिंदी गाण्यांवर अफलातून नृत्य सादर केली.
शाळेने सादर केलेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्याने प्रेक्षकांची दाद मिळवत कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले.
उपस्थितांनी मोठया रकमेची बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी केंद्र प्रमुख डी.बी.धायगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ माने व सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच-उपसरपंच सदस्य, इतर मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपास्थित होते.
मुख्याध्यापक विठ्ठल धायगुडे यांनी प्रास्ताविक केले. विशाल गिरी यांनी सूत्रसंचालन केले तर रविंद्र शिंदे यांनी आभार मानले.






