Amalner

?️ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर नगरपरिषदेच्या बुडा खाली अंधार..जलशुद्धीकरण केंद्रा वर कार्यरत कर्मचारी असुरक्षित

?️ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर नगरपरिषदेच्या बुडा खाली अंधार..जलशुद्धीकरण केंद्रावर कार्यरत कर्मचारी असुरक्षितअमळनेर नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर

गांधली,ता अमळनेर येथे नगरपरिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वात आहे.
या जलशुद्धीकरण केंद्रा वर नागरिक पाणी भरण्यासाठी येतात परंतू कुठल्याही प्रकारचे शारीरिक अंतर ठेवून पाणी भरले जात नाही.अमळनेर हे कोरोना च्या भीतीने घेरलेले असूनही पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मात्र झोपेतून जागे झालेलेच नाहीत.सध्या अमळनेर तालुका हॉट स्पॉट असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे कार्यरत कर्मचारी आणि गावतील नागरिक यांचे आरोग्य जपणे आवश्यक आहे.

?️ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर नगरपरिषदेच्या बुडा खाली अंधार..जलशुद्धीकरण केंद्रा वर कार्यरत कर्मचारी असुरक्षित

पाणी पुरवठा अत्यावश्यक सेवा आहे आणि कर्मचाऱ्यांना मात्र जीव धोक्यात घालून काम करावे लागतेआहे.येथे पाणी भरण्यासाठी येणारा नागरिक कुठल्याही प्रकारचा मास्क चा वापर करत नाही,शारीरिक अंतर ठेवत नाहीत, इकडे तिकडे थुंकतात असे प्रकार घडत आहेत. कर्मचारी काही नागरिकांना तर सांगितले असता कर्मचाऱ्यांना दाद देत नाहीत.

?️ठोस प्रहार ब्रेकिंग..अमळनेर नगरपरिषदेच्या बुडा खाली अंधार..जलशुद्धीकरण केंद्रा वर कार्यरत कर्मचारी असुरक्षित

अशा ठिकाणी जर कोरोना संसर्ग झाला तर पाणी पुरवठया वर परिणाम होऊ शकतो.
तरी नगर परिषदेने कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.ठोस प्रहारच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता अत्यन्त वाईट चित्र समोर आले आहे. तरी लवकरात लवकर या जलशुद्धीकरण केंद्रा वर सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करून नागरिक आणि कर्मचारी यांना सुरक्षित करणे आवश्यक आहे असे निदर्शनास आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button