“ठाकरे सरकारला” झोपेतून जागे करण्यासाठी तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन
“दार उघड उद्धवा, दार उघड”
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व धर्मीयांची मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंद होती. परंतु आता शासकीय निर्णयानुसार अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांचे जवळपास सर्व दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. एवढेच नव्हे तर दारूची दुकाने सुरू करण्यासही शासनाने परवानगी दिलेली आहे. लांबच लांब रांगा लावून दारू घेणारे ग्राहक सरकारला चालतात, परंतु संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत नागरिकांना मानसिक आधार देणारे, मन:शांती प्रदान करणारे व त्याचबरोबर अनेकांची उपजीविकाही असणारी मंदिरे व प्रार्थनास्थळे सुरु करण्यास मात्र परवानगी अद्याप मिळत नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवाची, निंदनीय व खेदजनक आहे.
सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी प्रार्थना स्थळे व मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडेही आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत हजारो नागरिकांना मानसिक आधार व उपजीविकेचा आधार असलेली सर्व धर्मीयांची मंदिरे व प्रार्थनास्थळे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.
या आंदोलनास विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य, देवस्थानचे प्रमुख, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, नगराध्यक्ष श्री.सचिन रोचकरी, श्री.विनोद गंगणे, श्री.बाळासाहेब शिंदे, श्री.विशाल रोचकरी, श्री.अविनाश गंगणे, श्री.गणेश नन्नवरे, श्री.आनंद कंदले, श्री.गुलचंद व्यवहारे, महिला जिल्हाध्यक्ष क्रांतीताई थिटे, श्री.सचिन पाटील, ॲड.अंजली साबळे, ॲड.स्वाती शिंदे, मीनाताई सोमाजी, श्री.बाळासाहेब भोसले, श्री.उमेश गवते, श्री.सचिन रसाळ, श्री.संजय खुरूद, श्री.गिरीश देवाळकर, श्री.सागर कदम, श्री.सचिन कदम, श्री.नागेश नाईक, श्री.धनंजय पाठक, श्री.विकास मलबा, श्री.प्रणव निकते, श्री.गुरुनाथ बडूरे, श्री.विशाल टोले, श्री.शिवाजी बोधले, श्री.शिवाजी गोरे, श्री.चंद्रशेखर भोसले, श्री.रत्नदीप भोसले, श्री.सुहास साळुंके, श्री.बाळासाहेब शमराज, श्री.अमरदीप तिकोने, श्री.नागेश गवते, श्री.दीपक तिकोने, श्री.विठ्ठल सोनवणे, श्री.हरिभाऊ काळदाते, श्री.मुकेश जाधव आदींची उपस्थिती होती.






