अमळनेर ग्रामीण काँग्रेस कमिटी तर्फे अतिवृष्टी ची नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषण..उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन
अमळनेर नूरखान
जळगांव जिल्हा अमळनेर तालुक्यातील जून – 2019 ते सप्टेंबर 2019 या
कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे व फळपिकांचे झालेल्या
नुकसानाचे अनुदान 15 ऑगस्ट, 2020 अखेर न मिळाल्यास उपोषण करण्यासंदर्भात निवेदन अमळनेर ग्रामीण काँग्रेस कमिटीने दिले आहे.
उपरोक्त संदर्भाधीन विषयाच्या अनुषंगाने ” जून 2019 ते सप्टेंबर 2019 ”
कालावधीत अमळनेर तालुक्यात
दिनांक 09 ऑगस्ट,2019 रोजी मंडळ मारवड 86 मिमी,पातोंडा 101,मिमी, वावडे 74 मिमी
दिनांक 10 सप्टेंबर,2019 रोजी मंडळ मारवड 140 मिमी, अमळगांव 80
मिमी या मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे 52 गांवातील 23194 शेतकरी बाधीत होवून त्यांचे एकूण वाचित क्षेत्र 19413.26 हेक्टर असून पिक क्षेत्राच्या प्रकारनिहाय नकसानीचा पंचनामाबाबत प्रपत्र अबक आणि ड मध्ये संयुक्त स्वाक्षरीचा अंतिम अहवाल मा.तहसिलदार अमळनेर यांचेकडून संदर्भ क्रमांक अन्वये दिनांक 14 नोव्हेंबर,2019 रोजी मा. जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडे पाठविण्यात आले होते.
संदर्भाधीन क्र.2 अन्वये जिल्हाधिकारी जळगांव यांनी मा.विभागीय आयुक्त नाशिक
विभाग नाशिक यांचेकडे दिनांक 24 डिसेंबर,2019, 10 जानेवार,2020 आणि 27 जानेवारी 2020 अन्वये ” जून, 2019 ते सप्टेंबर,2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधीत शेतपिकांचे व संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये मा. विभागीय आयुक्त,नाशिक विभाग नाशिक यांनी दिनांक 28 जानेवारी,2020, 12 फेब्रुवारी,2020 आणि 20 फेब्रुवारी,2020 अन्वये ” जून, 2019 ते सप्टेंबर,2019″ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत शेतक-यांचे शेतपिकांचे व फळपिकांचे झालेल्या नुकसानीबाबत मा.जिल्हाधिकारी,जळगांव यांचे कडील अहवालानुसार प्रपत्र अ,ब,क आणि ड मध्ये पिक क्षेत्राच्या प्रकार निहाय नोंदविलेल्या मागणीनुसार नोंदविलेली अनुदान आलेला आहे. फळपिकांचे नुकसानी करीला अनुदान उपलब्ध करुन देणेस विनंती केलेली आहे.
अशी मागणी मा अवर सचिव, महसूल व वनविभाग (मदत व पुर्नवसन) यांचेकडे अहवाल सादर केलेला आहे. याप्रमाणे संदर्भाधीन क्रमांक – 4 अन्वये स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामुदायिक
निवेदनाव्दारे दिनांक 24 फेब्रुवारी, 2020 अन्वये विशेष अनुदानाची मागणी केलेली आहे.
अहवालानुसार शासनाकडील दिर्घकालीन विलंबामुळे शेतक-यांमध्ये असंतोष व नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे.
त्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 5 अन्वये महाराष्ट्र शासन- महसूल व वनविभाग,
शासन निर्णय 1 फेब्रुवारी, 2020, 3 फेब्रुवारी,2020, 13 फेब्रुवारी, 2020 आणि 15 जुलै, 2020 च्या धर्तीवर जळगांव जिल्हा अमळनेर तालुक्यातील जून ,2019 ते सप्टेंबर,2019 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे व फळपिकांचे झालेल्या नुकसानीचे अनुदान 15 ऑगस्ट,2020 अखेर न मिळाल्यास ” 15 ऑगस्ट,2020 या स्वातंत्र्य दिनापासून शेतक-यांसह आम्ही उपोषण
करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदन देताना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,गोकुळ बोरसे, विक्रांत पाटील,मनोज पाटील,रवी पाटील इ उपस्थित होते.






