Amalner

समता शिक्षक परिषदेमार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर….. साईमतचे अमळनेर तालुकाप्रतिनिधी व देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन माध्यमिक गटातून तिसरा क्रमांकाचे बक्षीस.

समता शिक्षक परिषदेमार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर…..

साईमतचे अमळनेर तालुकाप्रतिनिधी व देवगांव देवळी हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन माध्यमिक गटातून तिसरा क्रमांकाचे बक्षीस.

अमळनेर प्रतिनिधी रजनीकांत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना अध्ययन-अध्यापन कसे करता येऊ शकते हे जाणून घेण्यासाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षकांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव शाखेच्या वतीने करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आव्हाने व उपाय किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अध्यापनातील आव्हाने व उपाय यापैकी एका विषयावर शिक्षकांकडून निबंध मागवण्यात आले होते. सदर स्पर्धेला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सहभागी सर्व शिक्षकांचे संघटनेच्या वतीने हार्दिक आभार. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद ही ‘गुणवत्ता हीच आमची मालमत्ता’ या ब्रिद नुसार शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते. तसेच विद्यार्थ्यास आपला केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून सदर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संघटनेचे माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ व प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष मा सुर्यकांत गरुड,
संघटनेचे राज्य पदाधिकारी धनराज मोतीराय तसेच रावसाहेब जगताप (विभागीय अध्यक्ष) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यशस्वी सर्व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन!!! यशस्वी शिक्षकांना संघटनेमार्फत ऑनलाईन प्रमाणपत्र आपण लवकरच प्रदान करणार आहोत. तसेच कोरोना नंतरच्या काळात उचित समारंभांमध्ये त्यांचा यथोचित गौरव सुद्धा करणार आहोत.
निबंध स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे…

माध्यमिक गट

प्रथम क्रमांक
1) संगीता सुकदेव सातव -माध्यमिक विद्यालय शेलवड तालुका बोदवड

द्वितीय क्रमांक क्रमांक
2) वर्षा आबासाहेब अहिरराव यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय मेहरुन जळगाव

3) तृतीय क्रमांक

ईश्वर रामदास महाजन
-महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल देवगाव तालुका अमळनेर

1)उत्तेजनार्थ क्रमांक :एक
भाग्यश्री पंकज तळेले
-प्रगति माध्यमिक विद्यालय जळगाव

2) उत्तेजनार्थ क्रमांक दोन
श्रीमती मेघा अनिल पाटील
– श्रीमती पी ए सोढा मराठी सार्वजनिक हायस्कूल नवापूर जि. नंदुरबार

प्राथमिक गट

प्रथम क्रमांक
1) सुरेंद्र प्रकाश बोरसे
-जि प प्राथमिक शाळा अंचळगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव

द्वितीय क्रमांक
2) गीता गौतमराव लढे (मदारे)
-जि.प.उ.प्राथमिक जलचक्र शाळा बोदवड ता.बोदवड

तृतीय क्रमांक

3) पल्लवी जगतराव शिंदे
– जि प प्राथमिक विद्यामंदिर कुसुंबे तालुका चोपडा जिल्हा जळगाव

उत्तेजनार्थ
दर्शना नथ्थु चौधरी
-जि प प्राथमीक शाळा शिरूर तालुका अमळनेर जिल्हा जळगाव
सर्व यशस्वी शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन बी एन पाटील(जिल्हाध्यक्ष माध्यमिक),सौ प्रभावती बावस्कर(जिल्हाध्यक्षा प्राथमिक)
प्रमोद आठवले,(जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग)
सौ छाया सोनवणे,(जिल्हाध्यक्षा महिला विभाग),रणजीत सोनवणे,(सरचिटणीस माध्यमिक),अजय भामरे(सरचिटणीस प्राथमिक),युवराज सोनवणे(जिल्हा कार्याध्यक्ष),व समस्त जिल्हा कार्यकारिणी जळगाव यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button