Pune

आदिवासी शेतकर्‍यांचा बाळ हिरडा माल खरेदी सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा – बिरसा क्रांती दल

आदिवासी शेतकर्‍यांचा बाळ हिरडा माल खरेदी सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा – बिरसा क्रांती दल
पुणे : आंबेगाव च्या पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांकडे हिरडा वनस्पतीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत सध्या आदिवासी भागात हिरडा तोंडणी जोरात सुरू आहे त्यामुळे हिरडा खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री यांना ईमेल करून निवेदनाद्वारे दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या हिरडीच्या झाडापासून हिरडा हे औषधी फळाचे उत्पादन मिळते. हिरडा हा माल हिरडा या झाडावरून दोन प्रकारात घेण्यात येते. बाळहिरडा हा माल एप्रिल, मे महिन्यात झाडावरून गोळा केला जातो तो कडक उन्हात वाळवून सुका करून त्यांची विक्री केली जाते. मोठा हिरडा हा माल झाडावर परिपक्व झालेला असतो त्याला बी आलेली असते हा माल झाडावरून आँक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्यात झाडावरून गोळा केला जातो.
आदिवासी शेतकऱ्यांचा सर्व प्रकारचा माल खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंंडळाची निमीत्ती करण्यात आली आहे परंतु आदिवासी विकास महामंंडळ आदिवासी शेतकर्‍यांकडून गेल्या चार वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्याचा बाळ हिरडा माल खरेदी करत नाही. हा संपूर्ण माल आदिवासी विकास महामंंडळानी खरेदी न केल्यामुळे आदिवासी शेतकऱ्याचे फार मोठा प्रमाणात नुकसान होते.
आदिवासी शेतकऱ्यांची बाळ हिरडा मालाची खरेदी सुरु करावी म्हणून आम्ही संबंधित आदिवासी विकास महामंंडळ मुख्य कार्यालय नाशिक यांच्याकडे नऊ महिन्यांपूर्वी पत्राद्वारे मागणी केली होती. आता सध्या मे महिन्यात बाळहिरड्याची झाडावरून काढणी सुरू आहे विक्री शेतकऱ्यांनी चालू केली आहे. परंतु शेतकऱ्यांचा माल आदिवासी विकास महामंंडळ व खाजगी व्यापारी खरेदी करत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अनेक वेळा आदिवासी विकास महामंंडळाकडे प्रत्यक्ष भेटूनही व लेखी मागणी करूनही महामंडळाचे महाव्यवस्थापकांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही व हिरडा खरेदी सुरू केली नाही.
आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील हे कुठल्याही प्रकारच्या आदिवासी शेतकऱ्याचे हित होईल असे कामकाज करत नाही. आदिवासी विकास महामंडळाच्या विकासाच्या योजना बंद केल्या आहेत. आदिवासी विकास महामंडळाने आदिवासी शेतकर्‍यांच्या विकासाच्या योजना उदाहरण ( वरई, सावा, भात, नाचणी ) सर्व प्रकरणाची धान्य खरेदी बंद आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात तोटा होत असून अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तरी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांची या पदावरून तसेच या ठिकाणाहून त्वरित तातडीने बदली करण्यात यावी. व त्यांच्या जागी कार्यक्षम आधिकारी नेमून आदिवासी शेतकर्‍यांच्या बाळहिरडा या मालाची तातडीने खरेदी सुरु करण्याचे आदेश आदिवासी विकास महामंडळाला देण्यात यावेत. अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, डी. बी. घोडे, दत्तात्रय गवारी, संजय मेमाणे, हरिभाऊ तळपे, अंकुश चिमटे, बजंरग लोहकरे, मारूती खामकर, संदिप माळी, सोमनाथ गेंगजे, बाळासाहेब डोळस, अनिल भोईर, डॉ हरिष खामकर, मारूती तळपे यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button