Khirdi

ड्युरा सिलेंडरसाठी रावेर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांतर्फे तीस हजारांचा निधी सुपूर्द.

ड्युरा सिलेंडरसाठी रावेर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांतर्फे तीस हजारांचा निधी सुपूर्द.

प्रविण शेलोडे खिर्डी ता. रावेर

खिर्डी : ग्रामीण रुग्णालय रावेर येथे कोवीड रुग्णांसाठी ड्युरा आँक्सिजन सिलेंडर उभारणी साठी तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बंधु भगिणींनी जमा केलेल्या मदतनिधी चा चेक ₹ ३०,०००/- मा.तहसीलदार मँडम यांचे कडे सूपूर्द केला यावेळी करतांना श्री.सुबोध चौधरी सर,श्री.शिवाजी येवले सर,श्री.वैद्य सर व श्री.नरेंद्र दोडकेसर , श्री.जी.बी.भोईसर प्रातिनिधीक स्वरूपात हजर होते. मदतनिधी उभारणी साठी तालुक्यातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर बंधू भगीनींनी मोठ्या स्वरूपात मदत दिली. फक्त एका शिक्षकांनी ही कल्पना मांडली त्याला तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला . आपणही समाजाचे देणे लागतो आणि अशा कठीण प्रसंगात कोरोनाच्या लढाईत आपण सुद्धा खारीचा वाटा उचलावा त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल हा उद्देश होता
रावेर ग्रामीण रुग्णालयात ड्युरा सिलेंडर उभारण्यासाठी रावेर तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत पाच लाखांपेक्षा अधिक रोख व धनादेश स्वरूपात निधी जमा झालेला आहे लवकरच रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन सेंटरच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button