Maharashtra

ग्रामीण भागात सोशल डिस्टन्स ग्राहकांचा प्रतिसाद

ग्रामीण भागात सोशल डिस्टन्स ग्राहकांचा प्रतिसाद

रजनीकांत पाटील

अमळनेर : तालुक्यातील शिरूड वि.वि.कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अंतर्गत सुरू असलेल्या स्वस्त धान्य दुकान चालकाने ग्राहकांनसाठी ठरावीक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे.

संचारबंदी च्या कालावधीत स्वस्त धान्य दुकानात गर्दी वाढत आहे. मात्र अशा वेळी कोणत्याही प्रकारच्या संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता. शिरूड येथील वि.वि. कार्यकारी सहकारी सोसायटी अंतर्गत सुरू झालेल्या स्वस्त धान्य दुकानचालकाने ग्राहकांनसाठी ठरावीक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली या संदर्भात ग्राहकांनी मार्गदर्शन केले.

संसर्गजन्य कोरोना व्हायरस हद्दपार करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक चांगला प्रतिसाद देत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button