खोपोली पोलीस व सहजसेवा फौंडेशन यांची जनता कर्फ्युत माणुसकी सेवा…
ताटातूट झालेल्या कुटुंबीयाची घडवून आणली भेट…
कोल्हापूरः आनिल पाटील
पोलिसांबद्दलच्या तक्रारी आपण नेहमी ऐकत असतो.मात्र पोलिसाच्या खाकी ड्रेसमध्येही एक माणूस असतो, है मात्र आपण विसरतो.समाजातील सामाजिक घटकांना एकत्र घेऊन चांगल्या प्रकारचे कार्यही प्रखर होते.खोपोली पोलिस व सहज सेवा फौंडेशन, खोपोली यांनी मानवतावादी काम करून आपली समाजाप्रती असलेली बाधिलकी जोपासली आहे,
22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यु मधील बंदोबस्तात व्यस्त असताना एक साधारण 25 वर्ष वयाचा तरुण खोपोली पोलिसांना वैकल्फग्रस्त स्थितीत रात्री 11.30 च्या सुमारास आढळला.खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिकारी अमोल वळसंग यांनी प्राथमिक चौकशीत प्राप्त झालेल्या काही माहितीनुसार सदर तरुण हा उस्मानाबाद जिल्ह्यातील असून कॉम्प्युटर डिप्लोमा धारक असून अचानकपणे बुद्धी भ्रष्ट असल्याने प्रवास करीत करीत खोपोली येथे दाखल झाला होता,मिळालेल्या महितीतुन घरच्यांचा तपास घेण्यात यश आले,या तरुणाचे नाव गौरव म्हस्के असून उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील हा रहिवासी आहे.यानंतर रात्री उशीर होत असल्याने सहज सेवा फौंडेशन, खोपोली यांच्या सहकार्याने या तरुणाची वैद्यकीय तपासणी,त्याच्या राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली. दिनांक 23 मार्च रोजी पुण्यातील त्याचे मामा व इतर नातेवाईक यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले, याकामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय खोपोलीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता वानखेडे,डॉ. निकिता कोठारी व संपूर्ण स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल वळसंग,सुधीर मोरे, रोहन भोईर, प्रवीण भालेराव,सारिका पाटील, अजिंक्य पाटील, कृष्णकांत गडदे यांच्या सोबत सहज सेवा फौंडेशन खोपोलीचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,संतोष गायकर, बंटी कांबळे, आयुब खान,बी.निरंजन यांनी गौरवच्या कुटुंबीयाच्या भेटीसाठी मोलाचे सहकार्य केले.
धावपळीच्या या दुनियेत जिथे स्वतःसाठी पुरेसा वेळ देता येत नाही त्याचवेळी ताटातूट झालेल्या कुटुंबियांना एकत्र येण्यासाठी देत असलेल्या सेवेबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले.






