बारामती कोरोनासाठी गंभीर
प्रतिनिधी – आनंद काळे
बारामती- बारामती दररोज कोरोनासाठी गंभीर अवस्थेकडे जात असून आज बारामतीतील रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासलेल्या 96 कोरोना संशयीतीच्या नमुन्यांपैकी तब्बल 16 जण कोरोना बाधित आढळले असून अजूनही 17 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. तर काल प्रतिक्षेत असलेल्या एकाच अहवाल पॉसिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामती शहर व तालुक्यातील आज 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
काल तालुक्यामध्ये 96 जणांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते,त्यामध्ये 16 रुग्ण आढळले आहेत.आज आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये शहरातील खाटीक गल्ली येथील 47 वर्ष पुरुष,शहरातील 17 वर्षीय युवक व 22 वर्षीय युवकांचा समावेश आहे.याखेरीज प्रगती नगर येथील 52 वर्षीय वडिलांसह 24 वर्षीय मुलांचाही समावेश आहे.
तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील 57 वर्षीय युवकांस कोरोनाची लागण झाली आहे.त्याचबरोबर गुणवडी येथील युवकांचा अहवाल पॉसिटिव्ह आला आहे.गुणवडीतील 37 वर्षीय पुरुष,माळेगावबुद्रुक येथील 29 वर्षीय पुरुष,तांदुळवाडी येथील 70 वर्षीय महिला व देवतांनगर येथील 36 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाली आहे.जळगाव सुपे येथील 50 वर्षीय पुरुष व समर्थनगर येथील 65 वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे.






