फ़ैज़ फिटनेस जिम तर्फे करोना योद्धा यांचा सत्कार कार्यक्रम कोरोना योद्धा यांचा.. शरीर निरोगी ठेवणे काळाची गरज
-विठ्ठल पवार राजे
असद खाटीक
धुळे –कोरोना आजारासारख्या जागतिक महामारीत प्रतिकारशक्तीचे महत्व आपल्याला अवगत झालेलं असून प्रत्येकाने आपले मन आणि शरीर निरोगी ठेवणे काळाची गरज असल्याचे मत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ गजेंद्र पाटील,खान्देश उपाध्यक्ष डॉ गणेश जायस्वाल, अल्पसंख्याक खानदेश आघाडीचे संगठक रईस सर हिंदुस्तानी उपस्थित होते.
हाथरस घटनेचा निषेध करणे व शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार राजे खान्देश दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या हस्ते धुळे येथिल जिल्हाधिकारी….. यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कोरोना योद्धा दिवंगत खाजगी डॉक्टरांना तात्काळ विमा रक्कम अदा न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, मोहम्मद मुस्तफा पहिलवान यांच्या विनंतीस मान देऊन विठ्ठल पवार यांनी मुस्लिमबहुल परिसरातील सुप्रसिद्ध फैज हेल्थ जिमला भेट दिली. कोरोना लॉकडाऊनमुळे जिमचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. वीज बिल, घर पट्टी व पाणी पट्टी माफ करून शासनाद्वारे जिम चालकांना दिलासा मिळावा याबाबतच्या चर्चेप्रसंगी विठ्ठल पवार पुढे म्हणाले की, मंदिर मस्जिद एवढेच व्यायाम शाळेलासुद्धा महत्व द्यायला पाहिजे. नियमित व्यायाम करणार्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रशिक्षित जिम चालकांच्या मार्गदर्शनाखाली शरीर सुदृढ ठेवणे आवश्यक असल्याचेही पवारांनी नमूद केले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष डॉ गजेंद्र पाटील,खान्देश उपाध्यक्ष डॉ गणेश जायस्वाल, अल्पसंख्याक आघाडीचे संघटक रईस सर हिंदुस्तानी यांनी मनोगत व्यक्त केले. फैज हेल्थ जिमचे संचालक.मोहम्मद मुस्तफा पहिलवान, जिल्हा कार्याध्यक्ष वीरेंद्र गिरासे, जिल्हा शहर अध्यक्ष डॉ प्रकाश पाटील,डॉ मनीष वडनेरे, देवेश पाटील, शेख इमरान भाई. वसीम भाई.. शोएब भाई……आदि व्यायामपटूनीं कार्यक्रमाचे संयोजन केले.






