सामाजिक कार्यकर्त्या आणि रासप च्या युवती जिल्हाध्यक्ष ज्योती भोई यांची गळफास घेऊन आत्महत्या…
रजनीकांत पाटील
अमळनेर प्रतिनिधी :
येथील सामाजीक कार्यकर्त्या आणि रासप च्या युवती जिल्हाध्यक्षा प्रा कु ज्योती भोई वय ३८ यांनी पैलाड येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि 10 ऑगस्ट रोजी घडली आहे.त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पोलीस वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला आहे. कु भोई या रासपच्या पदाधिकारी होत्या. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या देखील होत्या.सध्या नगर येथील पोलीस अधिकारी यांचे खाजगी प्रकरणी वाद झाला होता.
कु भोई यांचेवर यासह एका व्यक्ती वर जळगांव येथे खोट्या शासकीय ओळख पत्रांचा उपयोग करून फसवणूक केल्या प्रकरणी एका घटनेत गुन्हाही होता. कायम चर्चेत राहून कोणाशीही संघर्ष करणऱ्या या तरूणीने आत्महत्या केल्याच्या घटनेवर अनेकांचा विश्वास बसत नाही .त्यांच्या पश्चात आई-वडील, २ भाऊ असा परिवार आहे. रात्री ऊशिरा कु ज्योती यांनी कामकाज आटोपून आपल्या खोलीत झोपण्यास गेल्या. पहाटे आईने ऊठविण्यासाठी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही खिडकीतून डोकावून पाहिले असता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने पोलीसात खबर दिली .
सपोनी प्रकाश सदगीर, एकनाथ ढोबळे राहूल लबडे यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली दोन दिवस रजेवर असलेले पो नि अंबादास मोरे यांनी सकाळी ८ वाजता कारभार सांभाळताच पैलाडच्या श्रीकृष्ण कॉलनी परिसरात जात घटनेची माहिती जाणून घेत पंचनामा करण्याचे आदेश दिले.
याबाबत समाधान आप्पा भोई (वय ३०) यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम.पाटील यांनी केले.ज्योती भोई या एक लढवय्ये व्यक्तीमत्त्व म्हणून परिचित होत्या.समाजात होणाऱ्या अन्यायाविरुध्द पेटून उठत न्याय देण्याचे कार्य त्या करीत होत्या.आज आलेल्या वृत्तामुळे अनेक प्रश्न म्हणून उभे ठाकले आहेत. ज्योती भोई यांच्यासारख्या कर्तव्यतत्पर व धाडसी महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे असा प्रश्न उभा राहिला आहे.कितीही धाडसी व्यक्ति असली तरी शेवटी ती माणूस असते तिला मन भावना असतात आणि एक कोवळं मन ही असते त्या मनाला त्रासही होत असतो ह्या कडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते.
दरम्यान आत्महत्याच्या घटनेनंतर घटनास्थळावरुन सुसाईड नोट मिळाल्याची चर्चा होती मात्र पोलिसांनी नकार दिला आहे. दिवसभर या घटनेबाबत संपूर्ण शहरात उलट सुलट चर्चांना उत आला होता. अनेक चुकीच्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या.






