Usmanabad

बचत गट फायनान्स बँका लाईटबील महामंडळाचे कर्ज माफ करा,रिपब्लिकन सेनेचे निवेदन

बचत गट फायनान्स बँका लाईटबील महामंडळाचे कर्ज माफ करा,रिपब्लिकन सेनेचे निवेदन

प्रतिनिधी-सलमान मुल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्च 2020 पासून देशामध्ये व महाराष्ट्रभर कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून त्यामुळे आज तागायत सर्व प्रकारचे व्यवहार कामधंदे बंद आहेत.

त्यासाठी सामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामुळे शासनाने कर्ज फेड ही 03 महीने करु नका असे सांगितले आहे परंतु आता सर्व कर्ज देणाऱ्या बँका ह्या लोकांच्या मागे लागल्या आहेत.

आपण हप्ते भरण्यासाठी त्यामुळे मा मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की आज देखील लाॅकडाऊन असल्याने सर्व व्यवहार हे बंद आहेत त्यामुळे महिला मजुर लोकांना शेतकरी यांना पैसे भरु शकत नसल्याने बचत गट फायनान्स बँका यांनी पैशासाठी तगादा लावू नये परंतु हे लोकांना हतबल करताना दिसत आहेत.

यामुळे महिला मजुर लोकांना शेतकरी यांना आत्महत्या केल्या शिवाय पर्याय नाही असे दिसते कारण आजून बरेच दिवस जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळे हे हप्ते फेडू शकत नाहीत त्यामुळे मा मुख्यमंत्री साहेब यांनी बचत गट फायनान्स बँका यांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे. त्याचप्रमाणे लाईटबील हे देखील मार्च महिन्या पासून आजपर्यंत माफ करावे आणि सर्व सामान्य माणसाला शेतकरी यांना दिलासा द्यावा.

अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने येणाऱ्या 15 आॅगस्ट 2020रोजी कळंब तहसिल कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात येतील याची दक्षता घ्यावी निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले आहे निवेदनावर अनिल हजारे रिपब्लिकन सेना उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष लाखन गायकवाड रिपब्लिकन सेना कळंब ता अध्यक्ष सुरज वाघमारे मनोज भुंबे आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button