शिवजयंतीनिमित्त शरद पाटील यांचा पुणे येथे सन्मान
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे — माढा तालुक्यातील आढेगांव येथील कवी शरद पाटील यांचा अखिल भारतीय साहित्य परिषद व मानवसेवा विकास प्रतिष्ठान पुणे यांनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कविसंमेलन व विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात शरद पाटील यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मराठी पत्रकार भवन पुणे येथे सन्मान करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये शरद पाटील यांनी अनेक पारितोषिके मिळविली असून साहित्य क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा मराठी पत्रकार भवन पुणे येथे आयोजित कार्यक्रमात यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई, चित्रपट निर्माती अनुजा देशपांडे,उद्योजक सुनील तोटे, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ, अ.भा. मराठी साहित्य परिषदचे विदर्भ अध्यक्ष आनंदकुमार शेंडे, राजकुमार पाटील,डॉ.प्रमोद बकरे, माजी.सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय धोपावकर,अनुराधा चौरसिया, अभिनेत्री अलका भुजबळ, समाजसेविका मंगला बारी,अजय महाजन,विठ्ठल रणबावरे, चित्रकार प्रतिभा भूपाळ रावळ, डॉ नंदकिशोर पाटील यावेळी उपस्थित होते.






