एमपीएससी परीक्षा व रखडलेल्या नियुक्त्यांच्या मागणीसाठी एसएफआयचे आंदोलन
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : एमपीएससी परीक्षा, नवीन पदभरती, शिक्षण, रोजगार व रखडलेल्या नियुक्त्या आदी बाबींच्या मागणीसाठी आज शुक्रवार रोजी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया व डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षांपासून राज्यसेवा परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. लाखो विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. पुण्यात स्वप्नील लोणकर या विध्यार्थ्यांने सरकार मुलाखत घेत नाही म्हणून आत्महत्या केली. हजारो विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत.
त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात, शासनाच्या आश्वासनानुसार आयोगाच्या सदस्यांचे रिक्त जागांवर 31 जुलैपर्यंत पद भरती करावी, सरकारी विभागातील सर्व भरत्या एमपीसीच्या माध्यमातून कराव्यात, विभागातील भरतीसाठी महापोर्टल बंद करावे, विविध सरकारी विभागातील सर्व रिक्त जागा घोषित कराव्यात तसेच भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण झाली पाहिजे. आदी मागण्या यावेळी एसएफआयने आंदोलनाच्या माध्यमातून केल्या आहेत. यावेळी नितीन वाव्हळे, निशाद शेख, सत्यजित मस्के, जया तिडके, मदन राठोड, नारायण साळुंखे, आकाश देशमुख आदी उपस्थित होते






