बेलवळे बुद्रूक येथील मल्लांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सुभाष भोसले -कोल्हापूर
बेलवळे बुद्रूक (ता.कागल) येथील महात्मा जाेतीराव फुले हाय व ज्युनि. काॅलेजच्या कुस्तीपटूंनी विभागीय पातळीवर उज्ज्वल यश संपादन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील अंबवडे येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत धीरज कारंडे (८३ किलाेगट) याने ग्रीकाे प्रकारात प्रथम क्रमांक पटकवला. तसेच आेंकार रामचंद्र काशीद (७९ किलाेगट) याने तृतीय क्रमांक पटकवला. या कुस्तीपटूंची पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे हाेणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक आर.वाय.पाटील यांचे मार्गदर्शन व संस्थाध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक पी.टी.लाेंढे यांचे प्राेत्साहन लाभले.
धीरज व ओंकारचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






