लॉकडावूनमध्ये माळेगाव अभियांत्रिकीद्वारे नोकरीची संधी
प्रतिनिधी – आनंद काळे
बारामती – कोरोना महामारीमुळे उदभवलेल्या सध्या मंदीच्या वातावरणात शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिजिटल ऑनलाईन फ्लाटफॉर्मचा वापर करून कॅम्पस मुलाखतीद्वारे विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम. मुकणे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया वैयक्तिक व तांत्रिक मुलाखत या दोन स्तरावर मूल्यांकन करून झाली.या निवडप्रक्रियेतून एकूण 30 विद्यार्थ्यांची राज्यातील विविध कंपनीमध्ये निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कंपनीकडून 4.5 लाखाचे वेतन कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचे माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ माधव राऊळ यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब तावरे,विश्वस्त श्री अनिल जगताप,वसंतराव तावरे,रामदास आटोळे,महेंद्र तावरे,गणपत देवकाते,रवींद्र थोरात आदींनी अभिनंदन केले.






