धुळ्यात पोलिसांची दारू कारवाई
असद खाटीक
धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडजाई येथील अन्वर नाला याठिकाणी एका घरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू बनवून ती जिल्ह्यातील इतरत्र ठिकाणी विक्रीसाठी पाठविली जात असल्याची खात्रीलायक माहिती मोहाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांना मिळाल्यानंतर ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागात देखील देण्यात आली त्यानंतर मोहाडी पोलिस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा दोन्ही विभागांनी संयुक्त केलेल्या कारवाईमध्ये माहिती मिळालेल्या ठिकाणी तब्बल चारशे लिटर स्पिरिट व त्याचबरोबर दारू बनविण्यासाठी लागणारे इतर साहीत्य असा एकूण 2 लाख आठ हजाराहून अधिकचा मुद्देमाल या कारवाई दरम्यान पोलिसांनी हस्तगत केला आहे.
छापा टाकण्याच्या काही काळ आधीच आरोपी आपल्या ठिकाणाहून पसार झाले होते त्यामुळे या कारवाई दरम्यान आरोपी मिळून आला नसून संशयित आरोपी विरोधात दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलिस करीत आहेत….






