Paranda

प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांची महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड

प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांची महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड

सुरेश बागडे

परांडा

शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाचे प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांची महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे . या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक संतोष खरे ,मराठवाडा विभागाचे संघटक कोहिनूर सय्यद आणि सोलापूर जिल्ह्याचे संघटक महादेव गव्हाणे यांच्या उपस्थितीमध्ये प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांची महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यामधील अनेक महाविद्यालयांमध्ये शाळेमध्ये प्राध्यापक शिक्षक व इतर कर्मचारी काम करत असताना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद व त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांची महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड

सध्या प्रा डॉ शहाजी चंदनशिवे हे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्ष पदी कार्यरत आहेत, महाराष्ट्र अंडर प्रीवीलेजड टिचर्स असोसिएशनच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी ते कार्यरत आहेत तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजी नगर या विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागांमध्ये ते पीएचडीचे संशोधन मार्गदर्शक म्हणून काम पाहतात तर राजस्थान येथील जे जे टी या विद्यापीठांमध्ये ही प्राणीशास्त्राचे संशोधन मार्गदर्शक म्हणून काम पाहतात त्यांनी शैक्षणिक सामाजिक चळवळीमध्ये हे अनेक वेळा आपला सहभाग दाखवून उल्लेखनीय असे कार्य केले आहे त्यांना जिल्हास्तरीय पासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांच्या विविध कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्र राज्यातून अनेक मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे व कौतुक केले आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री यांचे सचिव सुनील चंदनशिवे जे एन यु विद्यापीठ दिल्ली येथील एचआरडीसी चे संचालक डॉ अरुण खरात मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शंकर अंभोरे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील प्राचार्य डॉ महादेव गव्हाणे जैवतंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ विश्वास शेंबेकर, शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे व सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी,श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर ,अध्यक्ष सुनील शिंदे, धाराशिव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे ,भूम येथील तहसीलदार उषाकिरण श्रंगारे. डी सह्याद्री इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेचे सर्व कार्यकारणी सदस्य ,परीवर्तन संस्था नळदुर्ग येथील सर्व सदस्य कळंब येथील प्राचार्य तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजी नगर या विद्यापीठाचे प्राणीशास्त्र विभागाचे माजी डीन डॉ अशोक मोहेकर ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजी नगर येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ चंद्रकांत हिवरे, डॉ राजेश करपे , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ राहुल मस्के , औरंगाबाद येथील सुनिल मगरे, फरग्यूसन महाविद्यालय, पूणे येथील प्राणीशात्र विभागप्रमुख प्रा डॉ नवनाथ चंदनशिवे, एस पी कॉलेज, भूम येथील प्राचार्य डॉ श्रीकृष्ण चंदनशिव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद उप परिसर उस्मानाबाद येथील सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे, अनिल हजारे अरुण गरड शिंदे उमेश कांबळे प्रा डॉ संजय कांबळे मिलिंद रोकडे, प्रा डॉ सिद्धार्थ होवाळ, परांडा शहरातील सर्व मित्र परिवार कळम तालुक्यातील सर्व शाळेचे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button