Pune

विद्यार्थीचे पालक व बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा वतीने दणका पाचगणी येथील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

विद्यार्थीचे पालक व बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा वतीने दणका पाचगणी येथील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे / प्रतिनिधी – अभिजित भालचिम

केंब्रिज हायस्कूल भिलार (पाचगणी) विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दोन शालेय कर्मचाऱ्यांनावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे पालक यांनी चार दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असताना यश मिळत नव्हते त्यामुळे पालकाच्या गुरूवार दिनांक १३/२/२०२० संपर्कात राहून रात्री ९ वाजेपासून संपर्कात असून पालकांनी दिलेली माहिती आधारे शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल केला नाही मग शनिवार दिनांक १५/२/२०२० रोजी बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा आक्रमक झाले आणि सकाळी ९ वाजेपासून सातारा जिल्हाचे पोलिस ग्रामीण अधिक्षक (SP) श्रीमती तेजस्वी सातपुते मँडम, डी व्हाय एस. पी. टेके साहेब, एपीआय बडवे साहेब यांना बिरसा क्रांती दल राज्य सचिव डी बी घोडे व पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी दुरध्वनी वरून संपर्क साधला आणि अँट्रोसिटी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.

विद्यार्थीचे पालक व बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा वतीने दणका पाचगणी येथील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

मात्र फक्त शनिवारी सकाळी दुरध्वनी वरून संपर्क साधून गप्प बसता कामा नये तर लगेच १२:३० वाजता बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा वतीने पुणे विभागीय उप आयुक्त प्रताप जाधव यांना निवेदन देऊन सर्व प्रकार सविस्तर सांगितला. मात्र उप आयुक्त जाधव साहेबांनी आमच्या समोर फोन करून सातारा उपजिल्हाधिकारी यांना संपर्क केला पण ते मिटींग मध्ये असल्याने जाधव साहेबांना फोन वर बोलता आलं नाही लगेच त्यांनी निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांना ईमेल केले. त्यावेळी बिरसा क्रांती दल राज्य सचिव डी बी घोडे, राज्य संघटक बाळकृष्ण मते, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशाताई सुपे, निवृत्त तहसीलदार यशवंत साबळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुपे, चिंधू आढळ, तानाजी गवारी, वसंत लांघी हे उपस्थित होते.

ईमेल गेल्यावर गुन्हा नोंद करण्याची कारवाई वेग आला.
त्यामध्ये भारतीय दंड संहिता १८६० कलम ३२३,३२४,३७९,५०४,५०६, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम११,१२, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ कलम ७५ ही कलम दाखल केली आहेत.
त्यामध्ये आदिवासी विचार मंच यांनी सुध्दा प्रकल्प अधिकारी घोडेगाव यांना भेटून निवेदन दिले होते.
सर्व पालक व संघटने मनापासून आभारी आहे. आदिवासी समाजावरील अन्याय दुर करण्यासाठी प्रयत्न केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button