Yawatmal

योग्य दिशेची चळवळ ही समाजाची खरी शक्ती – दशरथ मडावी नानाभाऊ बेले यांची बिरसा क्रांती दल महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती

योग्य दिशेची चळवळ ही समाजाची खरी शक्ती – दशरथ मडावी

नानाभाऊ बेले यांची बिरसा क्रांती दल महाराष्ट्र संघटक पदी नियुक्ती

यवतमाळ / प्रतिनिधी – प्रफुल्ल कोवे

बिरसा क्रांती दलाच्या बैठकीचे आयोजन डॉ. एन .डब्ल्यू पठाडे यांच्या निवास्थानी आयोजित करण्यात आली होती .या बैठकीचे अध्यक्षस्थानी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष डी .बी .अंबुरे, नारायण पिलवंड, प्रा.के.एम. बोके, माजी सैनिक भारत कांबळे, प्रफुल कोवे, दादाराव चिरंगे, इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविकात डी .बी .अंभोरे यांनी बैठकीचे उद्देश व सध्याची संघटन स्थिती स्पष्ट करण्यात आली.

बैठकीचे अध्यक्ष दशरथ मडावी म्हणाले की योग्य दिशेची चळवळच समाजाची खरी शक्ती असते आदिवासी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी बिरसा क्रांती दल या संघटनेत सहभागी झाले पाहिजे तसेच आता आदिवासी बांधवांनी प्रश्नावर बोलले पाहिजे लिहिले पाहिजे तर आदिवासी समाजाचा विकास होईल असे प्रमुख विधान करून त्यांनी मार्गदर्शन केले तसेच तसेच त्यांनी 2 फेब्रुवारी 2020 रोजी 12:30 वाजता यवतमाळ येथे बिरसा क्रांती दलाची जिल्हा आढावा बैठक होणार आहे. तरी या बैठकीकरिता जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान त्यांनी केले .तसेच यावेळी बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून नानाभाऊ बेले यांची निवड करण्यात आली .व त्यांना नियुक्ती पत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .

यावेळी पुसद तालुका अध्यक्ष म्हणून डॉ.एन .डब्ल्यू .पठाडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच पुसद महासचिव म्हणून विलास काळे ,पुसद तालुका कोषाध्यक्ष दादाराव चिरंगे ,पुसद तालुका संघटक अंकुश घावस , उमरखेड तालुका सचिवपदी महादेव भिसे ,महागाव तालुका उपाध्यक्षपदी बाळू रणमले,उमरखेड तालुका सचिव महादेव भिसे यांची नियुक्ती करण्यात आली व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले . या बैठकी करिता पुसद, महागाव ,उमरखेड या तिन्ही तालुक्यांमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .या बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा.कैलास बोके यांनी केले .तर आभार प्रदर्शन दादाराव चिरंगे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button