Amalner

? Big Breaking…अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायत पैकी १०८ ग्रा.प दिव्यांग ५% निधी खर्च प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या लढ्याला यश…

अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायत पैकी १०८ ग्रा.प दिव्यांग ५% निधी खर्च

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या लढ्याला यश

प्रतिनिधी: अमळनेर

अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत यांनी आपल्या स्वउत्पन्नातून दिव्यांगांसाठी राखीव असलेला५% निधी खर्च करण्यात आला प्रहार अपंग क्रांती आंदोलन शहराध्यक्ष योगेश पवार व प्रहार जनशक्ती कार्यकत्या प्रा.जयश्री साळुंके यांच्या पाठपुराव्याला शेवटी यश आले असता मा.गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी खर्च न केलेल्या ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांना लेखी आदेश काढून महाराष्ट्र जिल्हा सेवा (शिस्त व अपील ) नियम 1964 नुसार कठोर कार्यवाही केली जाईल असे पत्र दिले. शासनाने वेळोवेळी दिव्यांग राखीव निधी वेळेतच खर्च करण्याचे शासन निर्णय असून देखील ग्राम विकास अधिकारी आपल्या कामात हलगर्जीपणा करतांना दिसून आले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली असता वेळेवर दिव्यांग ५% निधी खर्च करून अमळनेर तालुका जळगाव जिल्ह्यातील १ नंबर वर आला आहे.

मा.ना.बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन व पदाधिकारी दिव्यांगांना वेळोवेळी मदत करून समाजात एक आदर्श ठेवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button