राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस व यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे ‘हृद्यदिन’ साजरा; डॉक्टरांचा करण्यात आला सन्मान
असद खाटीक
आज जागतिक हृदय दिनाच्या औचित्यपर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस व यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे रात्रंदिवस काम करणाऱ्या, हृदयाची काळजी घेणाऱ्या शहरातील ‘अंजना रुग्णालया’तील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, औषधनिर्माण शास्त्र, तांत्रिक सल्लागार, प्रयोगशाळा सहाय्यक आदींचा यथोचित सन्मान करण्यात येवून प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.*यावेळी डॉ दिपक शिंदे, समन्वयक रमेश शिंदे, प्रमोद ततार, लेखापरीक्षक संदीप शिंदे, फार्मासिस्ट तुषार अमृतकर, अनिकेत बोरसे, तांत्रिकी सल्लागार ज्ञानेश्वर कोळी, लॅब असिस्टंट प्राजक्ता जाधव, सेजल तिवारी, सुयोग पाटील, रवी पाटील, तृप्ती शिंदे, प्रवीण पाटील, परिचारिका दिपीका कोळी, काजल अटलाणी, स्नेहल ढालवाले, मनिषा कोळी, ललिता बोरसे, सरीता पवार, रंजना बाविस्कर, निखील पवार आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
डॉ. दिपक शिंदे, जळगांव जिल्हा निरीक्षक डॉ सुवर्णाताई शिंदे, जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोजताई कदम, जिल्हा सचिव मालतीताई पाडवी, शहर कार्याध्यक्षा तरुणा पाटील, जिल्हा सचिव रश्मी पवार उपस्थित होत्या..






