Maharashtra

ब्राम्हणशेवगे येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा अनोखा उपक्रम: भाऊबंदकीचा वाद मिटवून त्यांच्याच हस्ते केले वृक्षारोपण

ब्राम्हणशेवगे ता.चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे 
येथे शेताच्या बांधावरुन किशोर भरत राठोड आणि शिवाजी थानसिंग राठोड यांच्यात  किरकोळ वाद झाल्यानंतर प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेले होते सदर दोन्ही कुटुंबे हे भाऊबंद असल्याने व वाद पोलीस स्टेशन पर्यंत गेल्यास भाऊबंदकीत कायमस्वरूपी कटुता निर्माण होऊ शकते त्यामुळे नुकतेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.मदन परशराम राठोड यांनी नाईकनगर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात भाऊबंदकीची बैठक बोलावली व आपसातील मतभेद मिटवून त्यांच्यातील कटुता कायम स्वरुपी मिटावी यासाठी विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर वाद झालेल्यांच्याच हस्ते निसर्ग मित्र समितीचे तालुका अध्यक्ष श्री.सोमनाथ माळी यांच्या संकल्पनेतून लिंबाचे झाड लावण्याचा अनोखा निर्णय घेऊन त्यांनीच संगोपन करण्याचे बैठकीत ठरले जेणेकरून त्याच्या मनातील कटुता जाऊन लिंबाच्या झाडासारखी सावली त्यांच्या मनात निर्माण होईल या उद्देशाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याचे मदन राठोड यांनी नमुद केले तसेच यापुढे गावाचा वाद गावातच मिटवून असे उपक्रम राबविले जातील असे स्पष्ट केले.याप्रसंगी  जगराम मानसिंग राठोड, आनंदा गंगाराम राठोड, बद्रीनाथ फत्तू राठोड, भानुदास प्रल्हाद राठोड,आर.के.राठोड, नामदेव जयसिंग चव्हाण,ममराज प्रल्हाद राठोड उखा मेरचंद राठोड,रतन ओंकार राठोड, पंडित थानसिंग राठोड,मा.सरपंच ज्ञानेश्वर राठोड, सुभाष भरत राठोड, पोलीस पाटील राजेंद्र माळी, विकासो.चेअरमन विष्णू राठोड,नागु राठोड व नाईकनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्राम्हणशेवगे येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा अनोखा उपक्रम: भाऊबंदकीचा वाद मिटवून त्यांच्याच हस्ते केले वृक्षारोपण

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button