Pune

समर्थक आमदारांना मंत्रीपदं मिळावीत यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी;

समर्थक आमदारांना मंत्रीपदं मिळावीत यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी;

दत्ताजी पारेकर
पुणे : देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करुन उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार राष्ट्रवादीत परतले खरे. परंतु, नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही आपल्या समर्थक आमदारांना मंत्रिपदं मिळावीत यासाठी ते आग्रही आहेत. पुणे जिल्ह्यातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपैकी तिघांना मंत्रिपद मिळावं, अशी मागणी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीरपणे केलीय. त्यामुळं राज्यातील अजित पवार समर्थक कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळू शकतं याचा घेतलेला हा आढावा.

1. दत्तात्रय भरणे – बारामतीला अगदी लागून असलेल्या इंदापूर मतदारसंघातून भरणेंनी भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटलांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केलाय. हे ध्यानात घेता भरणेंना संधी मिळू शकते. 2. सुनील शेळके – भाजपच्या मावळ या गेल्या पंचवीस वर्षांपासून अभेद्य किल्ल्याला सुनील शेळकेंच्या माध्यमातून उध्वस्त करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी यश आलं. जायंट कीलर ठरलेल्या सुनील शेळकेंचा उपयोग एकुण मावळ लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी आणि शेजारच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी पहिल्यांदाच आमदार बनलेल्या शेळकेंना मंत्रीपद मिळू शकतं. शेळकेंची पार्श्वभूमी ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची असणं हे मंत्रीपद मिळण्यासाठी त्यांना अडचणीचं ठरू शकतं. परंतु, अजित दादांशी असलेली एकनिष्ठता त्यांच्या कामी येऊ शकते. 3. धनंजय मुंडे – अजित पवारांनी केलेल्या बंडात सहभागी असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. प्रश्न आहे तो कोणतं खातं मिळणार याचा. काका गोपीनाथ मुंडे यांचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमधे धनंजय मुंडे आले ते अजित पवारांच्या विश्वासावर. 4. राजेश टोपे – राजेश टोपे यांचे वडील माजी खासदार अंकुशराव टोपे हे शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात. परंतु, नव्या पिढीत राजेश टोपे यांचे सुर जुळले ते अजित पवारांशी. मराठवाड्यातुन निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोजक्या आमदारांमध्ये राजेश टोपे यांचा समावेश असल्यानं त्यांचा नंबर लागू शकतो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button