रमेश पाटील यांची आखिल भारतीय विभागप्रमुख पदी निवड
सुभाष भोसले-कोल्हापूर
खानापूर (ता.भुदरगड ) येथील रमेश राजाराम पाटील यांची आखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल,भुदरगड, राधानगरी तालुका विभाग प्रमूख पदी निवड करण्यात आली.
रमेश पाटील यांनी भुदरगड तालुक्यात ग्राहक चळवळीचे उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल त्यांना तालुका अध्यक्षपदावरून बढती देत विभाग प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. नेवासा जिल्हा अहमदनगर याठिकाणी झालेल्या आखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रांतीय अधिवेशन प्रसंगी प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी ते म्हणांले की,ग्राहक पंचायत चळवळ सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाईल .याकामी
त्यांना जिल्हाध्यक्ष अरुण यादव,संघटक जगनाथ जोशी,शिवनाथबियाणी,सहसंघटक प्रशांत पुजारी,सचिव सर्जेराव खाडे, सुहास गूरव यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्वाचे त्यांनी आभार मानले त्यांना मिळालेल्या या बढतीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






