Indapur

रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्या वतीने इंदापूरातील पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन.

रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्या वतीने इंदापूरातील पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन.

प्रतिनिधी दत्ता पारेकर

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची मोफत नेत्र तपासणी शिबीर शनिवार 29 रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत श्री नेत्र रुग्णालय व रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने आयोजित केले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष राकेश गणबोटे तसेच सचिव अजिंक्य इजगुडे यांनी दिली.

या संदर्भातील लेखी निमंत्रण संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना देण्यात आले असून समाजातील उपेक्षित गोष्टींना वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेचा मोलाचा हातभार लागतो मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी सामाजिक जाणिवेतून घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष राकेश गाणबोटे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button