Dhule

कोविड लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करा-डॉ.राजेंद्र भारुड

कोविड लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करा-डॉ.राजेंद्र भारुड

फहीम शेख नंदुरबार

नंदुरबार : दि.7-कोविड लसीकरणासाठी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांची ओळखपत्रासहीत माहिती संकलित करण्यात यावी आणि त्यांची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

कोविड-19 आजाराच्या लसीकरणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, सहायक संचालक कुष्ठरोग तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार उपस्थित होते.

बैठकीत जिल्हातील कोरोना योद्धे (फ्रंट लाइन वर्कर) व डॉक्टर्स यांचे लसीकरण आणि लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी वैद्यकीय यंत्रणेतील मनुष्यबळाच्या वापराबाबत चर्चा करण्यात आली. आशा आणि अंगणवाडी सेविकापर्यंत प्रत्येकाची नोंदणी योग्य पद्धतीने करावी, एकही कोरोना योद्धा लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे डॉ.भारुड यांनी यावेळी सांगितले. बैठकीत लसीकरणासंदर्भातील सूक्ष्म आराखडा सादर करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button