Motha Waghoda

मोठा वाघोदयातील ग्रा. प. त नवा भिडू नवा राज मुळे विकास कामे खोळंबली

मोठा वाघोदयातील ग्रा. प. त नवा भिडू नवा राज मुळे विकास कामे खोळंबली

लोकनियुक्त सरपंच यांना जात प्रमाणपत्र अभावी अपात्र होण्याची भिंती??

मुबारक तडवी

नूतन ग्राम विकास अधिकारी यांचा १४ वा वित्त निधीतील प्रस्तावित कामे करण्यास रोष
प्रतिनिधी मोठा वाघोदा.ता.रावेर/-. या ९ हजार लोकसंख्या १७ सदस्य व लोकनियुक्त सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीत ४ महिन्यांपूर्वी नियुक्ती मिळालेल्या ग्रामविकास अधिकारी श्री.जयंकार यांनी पदभार स्वीकारला मात्र गावात समस्यांचा डोंगर च उभा झाला गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारीची दुर्दशा मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मोठा वाघोदयातील ग्रा. प. त नवा भिडू नवा राज मुळे विकास कामे खोळंबली

सदैव पाण्यानं तुडुंब तुंबलेल्या गटारी पाहावयास मिळत आहे याचं तुंबलेल्या पाण्यात डास,शेपुटाचे किडे जिवजंतू ची उत्पती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे साफसफाई वगळता साधी औषध फवारणी करण्यात आलेली नाही व दुरुस्ती ही करण्यात आलेली नाही वर्ष उलटून ही ७ कोटी रुपये शासनाने जलस्वराज्य योजना अंतर्गत गावात मुबलक पाणी उपलब्ध व्हावे व पाणी टंचाई निर्माण होवू नये म्हणून नवीन टयुबवेल करणे, सर्वत्र नविन पाईप लाईन टाकणे , सांडपाणी निचरासाठी भूमिगत गटार बनविणे, गावात पाणी पुरवठा कामी जलकूंभ उभारणं , जलशुद्धीकरण यंत्र बसविणे सह अनेक कामे नमुद केलेली आहेत मात्र जलवाहिनी , जलशुद्धीकरण यंत्र चे काम वगळता जलकुंभासह इतर सर्व कामे अपुर्णा अवस्थेत आहेत ग्राम पंचायत सह अधिकारी, ठेकेदार बेफिकीर आहेत तसेच १४ वा वित्त आयोग निधीतून गावात रस्ते कॉंक्रीटीकरण ,जि.प.शाळा ई लर्निग करणे,वॉल कंपाऊंड करणे, अंगणवाडी दुरुस्ती खेळणी , गणवेश, विद्युतीकरण बिछायतीसह डिजीटल करणे, गटार बनविणे, सार्वजनिक शौचालये बांधणे, मागासवर्गीय निधीतून सौरदिवे बसविणे समाज मंदिर रंगरंगोटी सह सुशोभीकरण करणे, नवयुवक व महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, अपंगांना स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे अपंगांना कृत्रिम अवयव वाटप करणे सह अनेक कामे प्रस्तावित असुन निधी उपलब्ध आहे मात्र ग्रामपंचायतीत नूतन ग्राम विकास अधिकारी रुजू होवुन ही *नया भिडू नया राज*येईल अशी अपेक्षा मोठा वाघोदा वासियांना होती परंतु नूतन ग्राम विकास अधिकारी व लोकनियुक्त सरपंच हे १४ वा वित्त निधीतील प्रस्तावित कामे करण्यास निराश असल्यामुळे वाघोदा वासियांच्या पदरी निराशाच पडली आहे.

मोठा वाघोदयातील ग्रा. प. त नवा भिडू नवा राज मुळे विकास कामे खोळंबली

त्यातच ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच हे अनुसूचित जमाती पुरुष या राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढवित निवडून आले आहेत मात्र २४ महिने उलटून ही त्यांनी निवडणूक विभागाकडे त्यांचे अनुसूचित -जमातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही शासन परिपत्रकानुसार व नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळी ६ महीन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र दिले होते मात्र अद्यापही त्यांनी निवडणूक विभागाकडे जातप्रमाणपत्र सादर न केल्याने तेही अपात्र होण्याची दाट शक्यता असल्यामुळें सरपंच पद तळ्यात कि मळ्यात असल्यामुळे च सरपंच हे गावातील विकासात्मक कामांकडे मुद्दाम तर दुर्लक्ष करिता नसावे ना ? हा प्रश्न ही ग्रामस्थांना भेडसावत आहे तरी संबंधित ग्राम विकास विभागाचे रावेर तालुक्यातील गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित दखल घ्यावी व नुतन ग्राम विकास अधिकारी यांनी रोष पत्करून मोठा वाघोदा गावातील विकासात्मक कामे त्वरित सुरू करावी अशी अपेक्षा वजा मागणी वाघोदा वासियातुन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button