Dhule

ग्रामीण भागातील कोरोना ह्या संसर्गजन्य आजारासोबत संघर्ष करण्यास आरोग्य विभागासोबत स्थानीय नेतृत्वाची नितांत गरज त्याशिवाय पर्याय नाही..! डॉ. हिरा पावरा

ग्रामीण भागातील कोरोना ह्या संसर्गजन्य आजारासोबत संघर्ष करण्यास आरोग्य विभागासोबत स्थानीय नेतृत्वाची नितांत गरज त्याशिवाय पर्याय नाही..! डॉ. हिरा पावरा

राहुल साळुंके धुळे

धुळे : समुदाय आरोग्य अधिकारी(CHO), कोडीद ता.शिरपूर.

करोनाची दूसरी लाट गावातील जाणता बेसावध असताना आली किंवा आपल्या लोकांची आरोग्य साक्षरता पाहता ती येणे अपरिहार्य होती.

कोरोना हा आपल्या गावातील फक्त आरोग्याचा विषय नाही तर सामाजिक जनजागृती तसेच राजकीय जनजागृतीचा स्वरूपाचा मुद्दा आहे. त्यामुळे करोनाला आरोग्याचा प्रश्न म्हणून बघितले तर गावाचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते.

प्रत्येक गावातील चौकातील डिजिटल तरुण पिढीने मागच्या दोन दशकातील देशातील युद्ध अनुभवलेले (प्रत्येक्ष नाही तर किमान चर्चा सुद्धा) नाही. कोविड-19 विरुद्ध संघर्ष म्हणजे नेमका कुणा विरुद्ध आहे हे समजण्यास किमान ग्रामीण भागातील लोकांत, साक्षर युवकांत आरोग्य साक्षरता लागते जी आज घडीला ग्रामीण भागात आहे पण नगण्य आहे त्यात आपण पुढे येऊन ती साक्षरता करायला पाहिजे अडाणी लोकांना आपण साक्षर लोकांनी समजून सांगायला हवी नाहीतर आपणच अडाणी सारखे वागलो तर नुकसान गावाचे आहे.

कोविड-19 चा मृत्यदर कमी किंवा नगण्य आहे पण येणाऱ्या काळात आपण जर बिंदास राहिलो तर वाढायला वेळ लागणार नाही. (गावातील अनेक व्यक्ती बोलून दाखवतात घरी मरेल पण करोनाच्या दवाखान्याचे तोंड पाहणार नाही).
मागच्या वर्षी जनता कर्फ्यूच्या दिवशी विमानतून औषधी फवारणी करणार म्हणून कोणीतरी सांगितले होते पण आज पर्यंत फवारणी झालीच नाही. जनतेने आरोग्य विभागाशिवाय विश्वास कोणावर ठेवावा हा प्रश्न गावात अजून सुद्धा विचारला जातो.

कोविड-19 आजारापेक्षा करोनाची भिती, करोनाबद्दल समज-गैरसमज जास्त धोकादायक आहेत.
कोविड-19 आजार झाल्यावर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याना जीवंतपणी मृत्यु पेक्षा भयंकर वेदना होतात हे मागील लाटेतील अनुभव आहे.
दर पाच वर्षांनी बदलणारे शासन व तसेच कोरोना महामारीत प्रचंड जागे झालेले प्रशासन यांना जोडणारा दुवा म्हणजे गावातील स्थानीक नेतृत्व.
मागील वेळेस प्रत्येक गावातील तसेच प्रत्येक ठिकाणी कोविड-19च्या पहिल्या लाटेत गोंधळलेले (Confuse) स्थानीक नेतृत्व तसेच सर्वच विभाग दुसऱ्या लाटेत समोर येवून संघर्ष केला तर कोविड-19ला पुन्हा हरवणे शक्य आहे.
कोविड-19 सारख्या नैसर्गिक आपत्ती मध्ये निर्माण होणारी Morbidity व Mortality कमी करायची असेल तर आरोग्य साक्षरता व स्थानीक नेतृत्वा शिवाय पर्याय नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button