Bollywood

Bollywood: ड्रामा क्वीन राखी सावंत दवाखान्यात..!पार पडली मोठी शस्त्रक्रिया..!गेले दोन वर्षे झुंजत होती या आजाराशी..!

Bollywood: ड्रामा क्वीन राखी सावंत दवाखान्यात..!पार पडली मोठी शस्त्रक्रिया..!गेले दोन वर्षे झुंजत होती या आजाराशी..!

लोकं राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणतात. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या काही काळापासून ती तिचा नवा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. हे कपल नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतात. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे राखी अचानक पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

खरंतर, ड्रामा क्वीन राखी सावंतने मंगळवारी तिच्या चाहत्यांना धक्का दिला. जेव्हा तिने शस्त्रक्रियेपूर्वीचा डान्सिंग व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये राखीच्या हातावर एक बँण्डेज दिसत आहे. ज्यानंतर लोकांना राखीची शस्त्रक्रिया काय आहे आणि तिला काय झालं आहे हे जाणून घ्यायचं आहे. आता खुद्द राखीने याचा खुलासा केला आहे. राखीने सांगितलं की, ती गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत होती.

‘पोटात गाठ झाली’
राखी सावंतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, तिच्या पोटात गर्भाशयाच्या वर एक गाठ आहे. त्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या. राखीने सांगितलं की, जुहू येथील क्रिटिक्स हॉस्पिटलमध्ये तिच्यावर ४ तास मोठी शस्त्रक्रिया झाली. राखीच्या म्हणण्यानुसार तिला पुढील दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

राखीने या संवादादरम्यान सांगितलं आहे की, तिचा प्रियकर आदिल दुर्रानी हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेत आहे. तो तिच्यासोबत राहतोय. यावर आदिल राखीबद्दल बोलताना म्हणाला की, ‘माझी हिरोईन इथे बसली आहे, मग मी कुठे जाऊ?’

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button