? प्रेरणादायी….स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट पोलीस पाटील व उत्कृष्ट सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार म्हणून प्रवीण गोसावी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव… प्रा जयश्री दाभाडेसन..2002 पासून ते आजपर्यंत विविध क्षेत्रात काम करत असतांना अनेक अडचणींना सामोरे जाऊन नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला,शासन आपल्या दारी सारखा अभिनव उपक्रम व आज पर्यंत केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांच्या हातून आज प्रवीण गोसावी आणि सुरेश पाटील सुंदरपट्टी यांचा सन्मान..झाला.
महसूल वर्ष 2019-20 मध्ये आज रोजी तालुक्यातून उत्कृष्ट पोलीस पाटील व उत्कृष्ट सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार म्हणून प्रवीण गोसावी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी तालुक्याचे लाडके आमदार मा.श्री.दादासाहेब अनिल पाटील,अमळनेर नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील,मा. आमदार दादासाहेब कृषिभूषण साहेबराव पाटील,तालुक्याच्या कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी मा.श्रीमती सीमा अहिरे(मॅडम),अमळनेर नगरीचे लाडके तहसीलदार मा.श्री.मिलिंदकुमार वाघ साहेब,अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मा.श्रीमती विद्या गायकवाड(मॅडम),अमळनेरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री.अंबादास मोरे साहेब व माझे मार्गदर्शक मा.श्री.डॉ शरद पाटील (गोपनीय शाखा) अशा वरिष्ठांच्या हातून सन्मान झाला खरोखर प्रशासनास वेळोवेळी केलेली मदत व सहकार्या मुळे आज सन्मान झाला आणि कामाची उत्तम पावती दिली याबद्दल मी आभारी आहे अश्या भावनिक शब्दात प्रवीण गोसावी यांनी भावना व्यक्त केल्या .त्यांचे सामाजिक,शैक्षणिक, पत्रकारिता, क्षेत्रातून कौतुक होत आहे.






