महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेमार्फत आमदार प्रकाशआबिटकर यांचा सत्कार
सुभाष भोसले-कोल्हापूर
महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने राधानगरी विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा. प्रकाश आबिटकर साहेब यांची सदिच्छा भेट घेवून त्यांचा सत्कार केला यावेळी प्रकाश आबीटकर म्हणाले की,2005 नंतरच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना मिळणेसाठी प्रयत्न केले जातील.सर्व शिक्षक बंधू -भगिनीच्या इतर सर्व समस्येसंबधी निराकारण करणेचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.शिक्षक बंधू -भगिनींच्या पाठिंब्यामुळे मला या निवडणूकीत यश मिळाले हे ऋण कधीही विसरणार नाही असे भावनिक उ्दगार त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे , जिल्हा सहचिटणीस रणजित जठार , जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील ,भुदरगडचे तालुकाध्यक्ष विजय रामाने , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अजित माने , राधानगरी सरचिटणीस सागर कांबळे , संपर्क प्रमुख सागर पाटील , गणेश साळुंखे , प्रदीप पाटील व आदी हजर होते .






