Amalner

Amalner: जी.एस.हायस्कूल ला मिळणार ५० लाखांचा निधी..शाळेचा ८५ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा..

Amalner: जी.एस.हायस्कूल ला मिळणार ५० लाखांचा निधी..शाळेचा ८५ वा वर्धापनदिन जल्लोषात साजरा..

अमळनेर:-
येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल ला संसदीय कार्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांच्या खासदार निधीमधून ५० लाखांचा निधी मिळणार असल्याची घोषणा संस्थेचे संचालक सी.ए.नीरज अग्रवाल यांनी केली.शाळेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक हे होते.
खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल चा ८५ वा वर्धापनदिन १८ जुलै रोजी जल्लोषात साजरा झाला.संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ अविरत मेहनत घेत असून येणाऱ्या काळात संस्थेचा कायापालट केला जाणार आहे.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेसोबतच विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवायला हवा असे प्रतिपादन डॉ.अनिल शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
संसदीय कार्यमंत्री व्ही.मूरलीधरन यांच्या खासदार निधीतून शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्या निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक व्यायाम शाळा,प्रशस्त वाहनतळ तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची घोषणा संस्थेचे संचालक सी.ए.नीरज अग्रवाल यांनी त्यांच्या मनोगतात केली.हा निधी मिळावा यासाठी अमळनेरचे भूमिपुत्र तथा भाजपचे राष्ट्रीय नेते राजेश पांडे यांचे सहकार्य मिळाले असून,यापुढील काळात देखील संस्थेसाठी विविध माध्यमातून निधी आणण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असणार असल्याचे नीरज अग्रवाल यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल,शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,संचालक डॉ.संदेश गुजराथी,उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,विश्वस्त वसुंधरा लांडगे,सचिव तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य ए.बी.जैन,सहसचिव धीरज वैष्णव,प्राध्यापक प्रतिनिधी आर.एम.पारधी,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,संस्थेचे देणगीदार अनिल वैद्य,विवेकानंद भांडारकर,अभिजित भांडारकर,अर्बन बँक संचालक प्रवीण जैन,दीपक साळी, रणजित शिंदे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नितीन भदाणे,द्रौ.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी, प्रताप हायस्कूल च्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,उपमुख्याध्यापक आर.एल.माळी,नाईक वामन चव्हाण,र.सा.पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका एस.पी.शिसोदे,शाळेचे उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या ८५ व्या वर्धापनदिनाचा लोगो फुग्यांच्या सहाय्याने हवेत सोडण्यात आला.एस.एस.सी.परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.शाळेचा माजी विद्यार्थी दिनेश सनेर याची एमपीएससी मार्फत सहाय्यक कर निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.शाळेच्या विविध क्षेत्रातील प्रगतीच्या अहवालाचे वाचन मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांनी केले.सूत्रसंचालन ए.ए.पाटील यांनी तर आभार राहुल.जे.पाटील यांनी मानले.विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
शाळेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button