नेरीत आढळल्या चक्क तिन प्राचिन विहीरी–::पुरातन प्रेमी कवडू लोहकरे यांनी केली विहिरीची पाहणी
या विहिरीला”” मोट विहीर”” म्हणतात मोट विहीरी कधीही आटत नसल्याचा इतिहासकारांचा दावा
ज्ञानेश्वर जुमनाके
नेरी- चिमुर तालुका ऐतिहासिक भुमिने नटलेला आहे. ऐतिहासिक वारस्याने चिमुर तालुक्याला गतवैभव प्राप्त झाले आहे. चिमुर तालुक्यातील गडपिपरी, कोलारा तु, तिरखुरा, याठिकाणी पुरातन काळातील गोंड कालिन पाय-याच्या विहीरी पर्यावरण संवर्धन समिती च्या माध्यमातून उजेडात आणल्या व त्याच्या सौंदर्यीकरणासाठी व डागडुजी साठी शासनाकडे पाठपुरावा करने चालु आहे.
अशातच नेरी या खेड्यात तिन ऐतिहासिक विहीरी असल्याची माहिती पुरातन प्रेमी कवडु लोहकरे यांना माहिती होताच त्या विहीरी ची पाहणी केली. ह्या विहीरीचे वैशिष्ट्य पाय-याच्या विहीरी पेक्षा वेगळे आहे. या” मोट” विहिरीला पाय-या नसुन ह्या विहीरी शेतात आहेत. शेतकरी विहीरीचा उपयोग सिंचनासाठी करीत होते. ह्या विहीरीचे बांधकाम व पाय-याच्या विहीरीचे बांधकाम सारख्या दगडांनी केले आहे. यावरुन बावळी विहीर व मोट विहीरी यांच बांधकाम एकाच कालावधी म्हणजे गोंड कालिन असल्याचा अंदाज आहे. या मोट विहीरीवर हत्ती, वाघ अशा कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाही व कोणत्याही प्रकारची नक्षीकाम, कोरीव काम केलेलं नाही. मोटच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी काढायचे.शेतक-यांनी स्वत: स्वत:च्या शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी मोट विहीरी तयार केल्या. सन १७०० कालखंडातील असल्याचा अंदाज आहे. ह्या विहीरी शेतकऱ्यांच्या खाजगी शेतात आहे. ह्या तिन विहीरी त्या काळातील शेतकरी, मालगुजार यांनी तयार केल्याचा अंदाज आहे. पुरातन प्रेमी कवडू लोहकरे हे तिन मोट विहीरी बाबत तज्ञ इतिहासकार यांची मत, माहीती घेत आहेत. ह्या तिन विहीरी चे वैशिष्ट्ये, कालखंड, उपयोग या बाबत इतिहासकारांसाठी आव्हान ठरत आहे. यावेळी निखील भालेराव, आशिष ईखारे, क्रिष्ना मसराम, सुशांत इंदोरकर, पिपलायन आष्टनकर, मंगेश वांढरे, सुदर्शन बावने,आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ इतिहास कार अशोंकसिह ठाकुर यांचे मत
ह्या विहिरीला मोट विहीर म्हणतात,. अशाप्रकारची विहीर गोंडकाळात तयार झाली आहे. ह्या विहीरी “”कधीच आटत “”नाही. विहीराीला नेहमीच पाण्याचा झरा असतो.ह्या विहीरी शास्त्रीय पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. “”
अशोक सिंह ठाकुर
इतिहासकार चंद्रपुर
कवडू लोहकरे यांचे मत
“” ह्या तिन्ही विहिरीच्या संवर्धनासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार. एेतिहासिक वारस्याच्या अनमोल ठेवा जतन करण्यासाठी जनतेत जनजागृती करणार””
कवडू लोहकरे
पुरातन प्रेमी चिमुर






