Kolhapur

पोलिसानां सापङलेल्या मूलाचा अवघ्या पाच तासात शोध

पोलिसानां सापङलेल्या मूलाचा अवघ्या पाच तासात शोध

खोपोलीच्या सहजसेवा फाॅंङेशनला यश

कोल्हापूर ःआनिल पाटील

आज खोपोली येथे पोलिसांना सापडलेल्या मुलाचा अवघ्या 5 तासात शोध घेण्यात खोपोली पोलीस व सहजसेवा फौंडेशन, खोपोली यांना यश आले.
खोपोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार प्रमोद पाटील, नौशाद मुजावर व सहज सेवा फौंडेशन खोपोलीचे अध्यक्ष
डॉ शेखर जांभळे,बंटी कांबळे, धनराज जंबगी, रोहित ढेबे, मनोज रुपवते, श्रीनिवास हंचलिकर,बी. निरंजन, सलमान शेख, संतोष गायकर, संदेश शेट्ये,मोईन शेख रोहित गायकवाड, सांगडे येथील पोलीस पाटील जयेंद्र पाटील यांनी परिश्रम घेऊन केली शोध मोहीम यशस्वी..
हनुमंत राजू वाघमारे,वय साधारण 11 वर्ष, हा मूळचा मिळगाव,खोपोली येथील मुलगा 5 वर्षांपूर्वी आई वडिलांसोबत पुणे येथे राहत असून, पुणे येथून घरून एकटाच निघून आलेला, परंतु शिक्षण नसल्याने नक्की कुठे जावे हे समजत नसल्याने व पत्ता सांगता येत नसल्याने भांबावून गेला होता. खोपोली पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून सहज सेवा फौंडेशनचे सदस्य यांनी वेगवेगळ्या माध्यमातून अवघ्या काही तासात सदर मुलाचे नातेवाईक शोधून कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन केले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button