Latur

गुळखेडा येथे विविध उपक्रम राबवून शिवजयंती उत्साहात साजरी

गुळखेडा येथे विविध उपक्रम राबवून शिवजयंती उत्साहात साजरी

लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

औसा तालुक्यातील गुळखेडा गावात
सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त औसा पंचायत समितीचे सदस्य विनोद माने,विठ्ठल सुरवसे,रामेश्वर चेंडके, विठ्ठल पांचाळ सचिन गिराम, ग्रामपंचयात सदस्य भास्कर यादव,अरविंद भोसले,महालिंग गिराम,ज्ञानेश्वर गायकवाड, सुधीर भोसले चाँद शेख,यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व त्यांनंतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी छत्रपती जयंती महोत्सव समितीचे सर्व सदस्य सुशन भोसले,महावीर भोसले, महेश गिराम,वैभव भोसले,अनिल शिंदे, सचिन गायकवाड,सचिन भोसले,अक्षय भोसले,हर्षद भोसले,अमोल शिंदे,अनिल भोसले, सुनील भोसले,संतोष राजे,स्वामी समर्थ, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या जयंती सोहळ्यानिमित्त जयंती समितीच्या वतीने विनोद माने,विठ्ठल पांचाळ, भास्कर यादव,भास्कर भोसले अरविंद भोसले, यांच्या हस्ते जि प शाळेतील सर्व मुलांना शालेय साहित्य वही व पेन वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

गुळखेडा येथील शिवप्रेमींनी महिलाही जयंती सोहळ्यात सहभाग घेतला होता .गुळखेडा छत्रपती जयंती समितीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना शाळेतील मुलांना गावातील सर्वासाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता .सायंकाळी शिवरायांच्या प्रतिमेची मूर्ती ची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button