बापरे ..!पुणे शहर पोलिस दलातील कर्मचा-यासह 6 जणांचा अटक,सापकारी खंडणी अन् अपहरणाच्या गुण्यात पोलिस दलात खळबळ
पुणे-(शिरुर)- बापरे पुणे शहर पोलिस दलातील कर्मचा-यासह 6 जणांचा अटक,सापकारी खंडणी अन् अपहरणाच्या गुण्यात पोलिस दलात खळबळ
व्याजाने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करुन देण्यासाठी एकाचे अपहरण करुन मारहान करत डांबून ठेवल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिसांनी आज रविवारी सहा जणांना अटक केली असून यामध्ये पुणे शहर मुख्यालयातील पोलीस काँन्टेबलचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 डिसंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.किरण सोपान भिल्लारे (वय-35 रा.भिल्लारवाडी, कात्रज, पुणे), मनोज ज्ञानेश्वर भरगुडे (वय-32 रा. आंबेगाव फाटा, घनकवडी, पुणे), अनिल लक्ष्मण हगवणे (वय-33 रा. संभाजीनगर, धनकवडी), विशाल अनिल जगताप(वय-22 रा. भिल्लारवाडी, कात्रज), अभिजित दत्तात्रय देशमुख (वय-30 रा. अप्पर इंदिरानगर,बिबडेवारी), संदीप चंद्रकांत पोखरकर (वय-24 रा. संभाजीनगर, धनकवडी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.यामध्ये मनोज भरगुडे हा पुणे पोलीस मुख्यालयात पोलीस काँन्स्टेबल आहे. तर रंजीत उर्फ बाजू पायगुडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी नितीन कैलास पवार (वय-33 रा. टाकळी हाजी,ता.शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काय आहे प्रकरण? फिर्यादी यांनी अनिल हगवणे याच्याकडून व्यवसायासाठी मार्च 2018 मध्ये दरमहा 10 टक्के प्रमाणे 15 लाख रुपये घेतले होते. त्यावेळी हगवणे याने 500 रुपयांचा कोरा सही केलेला स्टँम्प आणि 5 बँकेचे कोरे चेक घेतले होते. फिर्यादी यांनी आजपर्यंत 10 लाख 50 हजार रुपये व्याज दिले आहे. तसेच फिर्यादी यांनी आरोपी किरण भिल्लारे याच्याकडून देखील 9 लाख रुपये घेतले असून व्याजापोटी 60 हजार रुपये दिले आहेत.आरोपी हगवणे आणि भिल्लारे यांनी मुद्दल आणि व्याजाच्या रकमेपोटी फिर्यादी यांच्याकडे 50 लाख रुपये मागितले. पैसे दिले नाहीतर 5 एकर शेत जमीन लिहून देण्यासाठी तगादा लावला. तसेच जमिन लिहून दिली नाहीतर पत्नी आणि मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. शुक्रवारी दि.17 रोजी. आरोपींनी किरण भिलारे याची गाडी आणायची असल्याचे सांगून फिर्यादी यांना घरातून जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. त्यांना धनकवड़ी येथील शंकर महाराज मठ येथे आणले असता पोलीस काँन्स्टेबल मनोज भरगुडे याने प्रकरण मिटवून टाक असे सांगत शिवीगाळ करुन मारहान केली. तसेच फिर्यादी यांना एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवल्याची तक्रार फिर्यादी यांनी शिरुर पोलीस ठाण्यात दिली. शिरुर पोलिसांनी सहा आरोपींना आज अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना 21 डिसंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या वतीने अँड.विजयसिंह ठोंबरे व अँड.हितेश सोनार यांनी काम पाहीले. पुढील तपास शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर तरीत आहेत.






