Aurangabad

भंडाऱ्याच्या जेवणातून विषबाधा

भंडाऱ्याच्या जेवणातून विषबाधा

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद खराडी या गावात शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमात गावातील सर्वच भाविकांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये गावातील जवळपास 70 टक्के लोकांना विषबाधा झाली आहे. यामुळे गावात व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील तुर्काबाद खराडी येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील सर्व लोकांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, याच भंडाऱ्याच्या जेवणातून ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. विषबाधा होण्याचं कारण काय असावं ? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या विषबाधेत गावातील शेकडो लोकांची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून विषबाधा झालेल्या नागरिकांवर गावातच उपचार सुरू असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख

Back to top button