Pandharpur

शासकीय महापूजेचा मान सेवेकऱ्यांना मिळणार

शासकीय महापूजेचा मान सेवेकऱ्यांना मिळणार

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरी नगरी मध्ये दरवर्षी परंपरेप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा दरम्यान दर्शन रांगेतील वारकऱ्यांना महापूजेचा मान दिला जातो मात्र यंदा तो मान मंदिरात असलेले विणेकरी, सेवेकरी यांना मिळणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठ्ठलाची आषाढी यात्रा रद्द करण्यात आल्याने फक्त मानाच्या दिंड्या व पासधारकांना मंदिरात प्रवेश देऊन परंपरा जोपासली जाणार आहे. एक जुलै रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री महोदय सपत्नीक महापूजेसाठी मंदिरात येणार आहेत. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत श्रीच्या शासकीय महापूजा वेळी मानाचा वारकरी म्हणून दर्शन रांगेतून वारकरी भाविक निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. यंदा शासकीय महापूजा दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोवीस तास पहारा देणारे विणेकरी यांची मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याच्या निर्णय समितीने घेतला आहे त्याचबरोबर रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण सहा विणेकरी यापैकी पांडुरंग ईश्वर चिठ्ठीने विठ्ठल ज्ञानदेव बडे (वय८४ वर्षे) राहणार मुक्काम पोस्ट चिंचपूर-पांगुळ तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांची निवड करण्यात आली विठ्ठल बडे हे मागील पाच ते सहा वर्षांपासून मंदिरात विना वाजवून पहारा देत आहे. व त्यांचे कुटुंबीय देखील माळकरी आहेत मागील तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते स्वतः मंदिरात सेवा करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button