Amalner

? अमळनेर येथे कोरोनाची घौड दौड रोखण्यासाठी पुन्हा 3 दिवस खेचले लगाम..उद्या पासून जनता कर्फ्यु लागू..

? अमळनेर येथे कोरोनाची घौड दौड रोखण्यासाठी पुन्हा 3 दिवस खेचले लगाम..उद्या पासून जनता कर्फ्यु लागू..

अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेस येते की, मा. जिल्हाधिकारी जळगाव
यांचेकडील आदेशानुसार पुन्हा 3 दिवस जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.

जिल्यामध्ये दि.31/05/2020 पावेतो लॉकडाऊन वाढविणेत आलेला आहेत.
त्यानुसार जळगाव जिल्हयातील जळगाव, चोपडा, अमळनेर, भुसावळ, पाचोरा, यावल,
फैजपूर, धरणगांव व भडगांव या नगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील केवळ अत्यावश्यक वस्तु
व सेवा (किराणा, भाजीपाला, फळे, औषधे, मेडीकल, दवाखाना, इंधन व इ.) पुरविणाऱ्या
आस्थापना / दुकाने / यंत्रणा हया सुरु राहतील अन्य कोणत्याही प्रकारचे दुकाने / आस्थापना यंत्रणा सुरु ठेवता येणार नसल्याबाबत मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी आदेशित केलेले
आहे.

तरी अमळनेर तालुक्यामध्ये केवळ अत्यावश्यक वस्तु व सेवा (किराणा, भाजीपाला, फळे,
औषधे, मेडीकल, दवाखाना, इंधन व इ.) पुरविणाऱ्या आस्थापना / दुकाने / यंत्रणा हया
सकाळी 09:00 ते दुपारी 3:00 या वेळेतच सुरु राहतील अत्यावश्यक सेवा वगळता अमळनेर
तालुक्यातील अन्य कोणतेही दुकाने / आस्थापना / यंत्रणा सुरु ठेऊ नये.

दि.20/05/2020 ते दि.22/05/2020 या कालावधीत लोकप्रतिनिधी व जनतेच्या आग्रहास्तव कडकडीत जनता कयूं पाळण्यात येत असल्याचे आव्हान केलेले आहे.
तरी सर्वांनी घरात राहुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करणेत येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button