Lonand

युवा स्पंदन कवी संमेलन व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन

युवा स्पंदन कवी संमेलन व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन

दिलीप वाघमारे

ताथवडा येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे माणगंगा साहित्य परिषद व सिटीझन जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवा स्पंदन कवी संमेलन व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी अशोकराज दिक्षीत होते यावेळी व्यासपिठावर संयोजक ताराचंद्र आवळे, गाडगे महाराज संस्थेचे हेमंत शिंदे, प्रमुख पाहुणे सी.डी.ढोबळे,प्रकाश सस्ते उपस्थित होते.सुरवातीला गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

युवा स्पंदन कवी संमेलन व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन

कवी संमेलनामध्ये किरण अहिवळे यांनी मन व घोर जिवाला, प्रमोद जगताप यांनी आई व लेक,विक्रम गायकवाड यांनी जीवन व देवा विचारीन म्हणतो, प्रा.अशोक माने यांनी गाडगे बाबा व आई,दलित गायकवाड यांनी वाढदिवस व जग हे मला घावले,जनार्धन गार्डे यांनी परिरणी व आपला गाव,पोपट जाधव यांनी शिंदे महाराज व ताराचंद्र सुयश आवळे यांनी झिंगाट व याड लागल या विविध प्रकारच्या कविता सादर करून आश्रमशाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ,काव्यप्रेमीना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराज दिक्षीत यांनी आई व कोंबडी या कविता सादर करून सर्वांना काव्याबद्दल व जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले.

युवा स्पंदन कवी संमेलन व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन

यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थी आनंदी झाले व खळखळून हसले त्यांच्या मनतील आनंदाचे भाव बोलून दाखवले अशी ही काव्यमैफिल आश्रमशाळा ताथवडा छान रंगली . हेमंत शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले सर्व कवीना शाल ,पुस्तक व सन्मानपत्र देऊन गौरवन्यात आले. ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक केले.आभार बालकवी सुयश आवळे यांनी मानले.यावेळी आवळे परिवाराकडून ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देऊन आश्रमशाळेलीत विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आला. या कर्यक्रमामुळे समाधान व्यक्त करून अशा कार्यक्रमाची गरज आहे या भावना व्यक्त केल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button