प्राणीसंग्रहालयाच्या नामकरणाला विरोध, बाळासाहेब ठाकरे ऐवजी “गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर “असे करा:बिरसा क्रांती दलाची मागणी.
रत्नागिरी : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचे नामकरण ‘गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर ‘ असे करण्यात यावे, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नागपूर नगराची स्थापना सुमारे ३५० वर्षापूर्वी गोंड राजे बक्त बुलंद शहा यांनी केली.नागपूर सह विदर्भातील सर्व जिल्हे हे गोंडवाना प्रदेश म्हणून ओळखले जाते.ऐतिहासिक दृष्ट्या गोंडवाना भू प्रदेशला खूप मोठे आदिवासी सांस्कृतिक महत्व प्राप्त आहे.गोरेवाडा तलावाची निर्मिती ही गोंडवणातील महाराज यांचे काळातील आहे,आदिवासी समाजाची अस्मिता या भागाशी जुळलेली आहे,म्हणून सातत्याने आदिवासी समुदायाकडून ‘ गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर ‘ असे करण्याची मागणी शासन स्तरावर करण्यात येत होती.मात्र मंगळवार दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी समाज भावना लक्षात न घेता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे नामकरण करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला.यामुळे आदिवासी समाजाच्या भावनेला धक्का पोहचला आहे व सरकार विरोधी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती आदिवासी समुदायाला आदर आहे मात्र त्यांचे नाव हे उद्यानाला न देता इतरत्र कुठेही दिल्यास आदिवासी समुदायाला हरकत नाही त्याचे आम्ही स्वागत करू मात्र आदिवासी समुदायाची अस्मिता,संस्कृती जुळलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला ‘गोंडवाना आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर ‘ असे करण्यात यावे अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.
याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.






