मंत्री आला की त्याला दुधाने आंघोळ घाला- बारामतीत राजू शेट्टी आक्रमक
प्रतिनिधी- आनंद काळे
बारामती- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री राजू शेट्टी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन पुकारत आहेत.राजू शेट्टींनी आज बारामतीत दूध दरवाढ विरोधात राज्यसरकारविरुद्ध आंदोलन पुकारले होते.राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली बारामतीत बारामती नगरपरिषदपासून ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला.यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत “मंत्री आला की त्याला दुधाने आंघोळ घाला” असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
राजू शेट्टी बारामतीत दाखल होताच त्यांचे वाजत गाजत स्वागत केले.मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आपल्या सोबत जनावरांना घेऊन आले होते.यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गोमूत्राची किंमत 110 रुपये पण आमच्या दुधाला किंमत नाही असा घणाघात राजू शेट्टींनी केला.
राज्यातील दूध उत्पादकांची पिळवणूक होत आहे.उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने दूध उत्पादकाना दर मिळत आहे.प्रतिलीटर 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च असलेल्या दुधाला दर वाढवून देण्यात यावा,दुधावरील जीएसटी रद्द करण्यात यावी,केंद्र सरकारने दूध भुकटीवरील आयातीचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या राजू शेट्टी कडून करण्यात आल्या.






