विठ्ठलवाडीत वडाच्या झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्त्या…
प्रतिनिधी : दत्ता पारेकर पुणे
पुणे : इंदापूर -अकलूज रोडवर विठ्ठलवाडी बस स्टॉप च्या समोर रविवार ( दि. 8) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका इसमाने वडाच्या झाडाला पारंब्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना घडली. सोमनाथ महादेव इताप (वय 35 , रा. सरस्वतीनगर, इंदापूर) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अनिल गणपत साळुंखे (राहणार चाळीस फुटी रोड , इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत इंदापूर पोलिसांनी सांगितले की, मयत सोमनाथ इताप यास दारूचे व्यसन असल्याने त्याने वडाच्या झाडाला पारंब्या च्या साह्याने गळफास घेतला याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार श्री. वाघ करीत आहेत.






